crime 
विदर्भ

एक महिन्यापासून तो होता बेपत्ता! शेवटी...

दीपक फुलबांधे

लाखांदूर(जि. भंडारा) : अलिम खॉं हा अभिकर्ता नेहमीप्रमाणेच 17 जून रोजी कामावर गेला. मात्र परत आलाच नाही. तो घरी न आल्याने आणि त्याचा काहीच पत्त लागत नसल्याने घरच्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. गेल्या एक महिन्यापासून पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र काहीच हाती लागत नव्हते.

एका पतसंस्थेत गेल्या वर्षीपासून वसुली अभिकर्ता म्हणून काम करणारा हा तरुण 17 जूनला बेपत्ता झाला. त्याची तक्रार दिघोरी पोलिसांत करण्यात आली होती. पोलिसांनी तपास व शोध मोहिम राबविली.

बारव्हा येथील हा अभिकर्ता 17 जूनला बारव्हा येथून लाखांदूरला स्वतः:च्या दुचाकीने (क्रमांक एमएच 36/ ई 2826) गेला होता. घरून जाताना त्याच्या जवळ अंदाजे 50 हजार रुपये रोख रक्कम होती. त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी फोनवरून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याच्याबद्दल कोणतीही माहिती मिळत नसल्याने 18 जूनला दिघोरी पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार केली. त्यावरून दिघोरी पोलिसांनी परिसरात शोध घेतला. महिनाभर तपास चक्रे फिरविली जात होती.

तब्बल एक महिन्यानंतर सोमवारी त्या अभिकर्त्याचा दांडेगाव जंगलात कुजलेला मृतदेह आढळून आला. मृताचे नाव अलिम खॉं इस्माईल खॉं पठाण (वय 47,रा. बारव्हा) असे आहे.

दांडेगाव येथील घनदाट जंगलात सोमवारी गस्तीवर गेलेले वनमजुर ए. एन. कुळसुंगे यांना कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह व दुचाकी आढळून आली. वनमजुराने तत्काळ लाखांदूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय आणि दिघोरी पोलिसांना त्याबद्दल माहिती दिली. त्यावरून वनपरिक्षेत्राधिकारी आर. एस. दोनोडे, वनपाल व्ही. बी. पंचभाई, वनरक्षक एस. जी. खंडागळे, जी. डी. हत्ते ठाणेदार नीलेश गावंडे, पोलिस कर्मचारी विष्णू थंडार्ते यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. हा मृतदेह त्या बेपत्ता अभिकर्त्याच असल्याचे निष्पन्न झाले.

सविस्तर वाचा - अमरावतीत पहिला प्रयोग! कोरोनाविरुद्धच्या लढ्याला आता संघटित प्रयत्नांचे अधिष्ठान

घटनास्थळावर मृतदेहापासून 10 ते 12 फूट अंतरावर मृताची दुचाकी आणि काही अंतरावर चपला आढळून आल्या. कुजलेला मृतदेह बांबूच्या झाडाजवळ झोपलेल्या अवस्थेत होता. यामुळे बेपत्ता अभिकर्त्याच्या मृत्यू कसा झाला? हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नीलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahalaxmi Express Robbery : महालक्ष्मी एक्स्प्रेसवर मध्यरात्री दरोडा; ट्रेन १५ मिनिटे रोखली, महिला प्रवाशांचे दागिने लुटून चोरटे पसार

Khadakwasla Dam Water Storage : खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस; जाणून घ्या कोणत्या धरणात किती पाणी, पुण्याच्या पाणीपुरवठ्यावर टांगती तलवार?

CNG Price: सीएनजी प्रतिकिलो ९० रुपयांवर! रिक्षा-टॅक्सीचालकांना फटका; दोन महिन्यांत दुसरी दरवाढ

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँकेसाठी सोसायटी गटात प्रतिष्ठेच्या लढती

Sports News: सिंधू, लक्ष्यला विजेतेपद; हायलो ओपन स्पर्धेमध्ये यश

SCROLL FOR NEXT