

CNG Price Hike
ESakal
मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) मुंबई आणि महानगर प्रदेशातील (एमएमआर) सीएनजीच्या दरात एक रुपयाने वाढ केली आहे. त्यामुळे सीएनजीचा दर प्रतिकिलो ९० रुपये झाला आहे. गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी, तर सप्टेंबरपासूनची तिसरी दरवाढ आहे. याचा फटका रिक्षा आणि टॅक्सीचालकांना बसला आहे.