Hobby Buddy Cheese Hai ... Lockdown is also getting real ... 
विदर्भ

शौक बडी चिज है... लॉकडाऊनमध्येही मिळतोय खर्रा...

सकाळ वृत्तसेवा

भद्रावती (जि.चंद्रपुर) : लॉकडाऊनमधे जीवनावश्यक वस्तूं व्यतिरिक्त इतर सर्व दुकाने बंद आहेत. कुठलेही व्यसन सोडायला एक महिना पुरेसा असावा. मात्र शौकीन शौक पुर्ण करण्यासाठी आपल्या गरजेची वस्तू बरोबर शोधतो व अशा वस्तूंचा पुरवठा करणारे याच संधीचा फायदा घेऊन ब्लॅकमधे छुप्यारीतीने विक्री सुरू ठेवतात.

शहरात खर्रा शौकीन भरपूर आहेत. भद्रावतीचा खर्रा जिल्ह्यात प्रसिध्द आहे. चंद्रपुर शहरात 'भद्रावती' नावाने अनेक खर्रा सेंटर लाँकडाऊनमध्येही सुरू आहेत. यावरुन भद्रावतीच्या खर्रा शौकीनांचा अंदाज येवू शकतो.

लॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने बंद आहेत, तरीही खर्रा शौकीनांना खर्रा मिळतोच. यात काही आश्चर्य नाही. खर्याची दुकाने जिथे आहेत, त्या बंद दुकानासमोर जावून उभे राहिले की दुकानदार किंवा त्याची मुले ग्राहकाला बरोबर हेरून जवळ येतात, खर्र्याची पुडी गुपचुप ग्राहकाला देतात, ग्राहकही खिश्यातून पैसे काढून त्याला देतो व निघून जातो.

असा प्रकार शहरात नियमित सुरू आहे. खर्रा घोटणारे घरीच खर्रा घोटतात. त्याच्या पुड्या तयार करतात. त्या लपवून ठेवतात व दुकानासमोर, घरासमोर किंवा चौकात बसून राहतात. नेहमीची ठिकाणे खर्रा शौकीनांना बरोबर माहित आहेत.

बंदीतही सुगंधित तंबाखु कुठून येतो व विकल्या जातो, हा प्रश्नच यानिमित्ताने उद्भवला आहे. या काळात 10 रु. ला मिळणारा खर्रा 30 रु. चा झाला आहे. 200 रु. किमतीचा बाबुल सुगंधित तंबाखूचा डब्बा 400 रुपयाचा झाला आहे. तर 350 रु. प्रती कीलो असलेली सुपारी 650रुपये प्रती किलो झाली आहे. तरीही शौकीन घेतात व दुकानदारांद्वारा लूट सुरू आहे.

दारूही होते उपलब्ध

ख-र्याप्रमाणेच शहरात दारू देखील मिळत आहे. अवैध दारू विक्रेते नेहमीच्या दारू शौकीन ग्राहकांना दारूचा पुरवठा करीत आहेत. लॉकडाऊन मध्ये संपूर्ण जिल्हा बंदी असतांना दारू नेमकी येते कुठून, हा प्रश्नच आहे.
त्यामुळे लॉकडाऊन मध्ये शहरात सुरू असलेली अवैध दारू व सुगंधित तम्बाकू विक्री रोकण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT