Holi tradition celebrated by Indians abroad! 
विदर्भ

भारतीयांनी विदेशातही जपली होळीची परंपरा!

सकाळ वृत्तसेवा

शेलुबाजार (जि.वाशीम) : भारतीचा संस्कृतीचा वारसा हा आपल्या सणांच्या माध्यमातून वर्षानुवर्षे जपला आहे. तसेच विदेशात गेलेल्या भारतीयांनी सुद्धा हा वारसा कायम ठेवला आहे. त्यामुळेच अमेरिकेत राहत असलेल्या भारतीयांनी आज (ता.9) विधीवत पूजन करून होळीचे दहन केले. अशी माहिती शेलुबाजार येथील नितीन शालीग्राम घोडे यांनी अमेरिकेतून दिली आहे.


भारतीय संस्कृतीला अनेक सणांच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा लाभला आहे. त्यात भारतातील अनेक भाषा, जाती, समुदाय, वेगवेगळ्या परंपरांचा पूर्वापार चालत आलेल्या आहेत. भारतात सणांच्या माध्यमातून जो सांस्कृतिक वारसा जपला जातो, तो आज विदेशातही भारतीयांनी जपला आहे. शेलुबाजार येथील रहिवासी व नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेतील अटलांटा शहरात परीवारासह वास्तव्यास असलेले नितीन घोडे हे भारतीयांच्या उत्सवात सहभागी होतात. होळीच्या निमित्ताने आज (ता.9) अटलांटा येथील राम मंदिर परिसरात होळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता तेथील रहिवासी असलेल्या भारतीयांनी राममंदिर परीसरात उपस्थित राहून विधीवत पूजाअर्चा करून होळीचे दहन केले. या होळीच्या निमित्ताने मोठ्या मंडळीसह लहानग्यांनीही होळीचा उत्सव अमेरीकेत अनुभवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात ओवेसींच्या सभेत गोंधळ, चेंगराचेंगरीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?

India ODI Matches in 2026: विराट कोहली - रोहित शर्मा २०२६ मध्ये १८ वनडे सामने खेळणार? भारतीय संघाचे वर्षभराचे वेळापत्रक जाणून घ्या

मोठी बातमी! महापालिकेच्या मतदानाच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’ची मुदत संपली, आता ‘या’ लाडक्या बहिणींनाच संधी, वाचा...

Crispy Matar Cutlets Recipe: घरीच बनवा हॉटेलसारखे क्रिस्पी मटार कटलेट, 15 मिनिटांत तयार होईल ही सुपर टेस्टी रेसिपी

Panchang 5 January 2025: आजच्या दिवशी शिव कवच्य स्तोत्राचे पठण आणि ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT