home isolation  e sakal
विदर्भ

विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण बंद, पॉझिटिव्हीटी रेट जास्त असल्यानं निर्णय?

भाग्यश्री राऊत

नागपूर : ज्या जिल्ह्यांचा कोरोना पॉझिटिव्हीटी रेट (corona positivity rate) जास्त आहे अशा जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरणात (home isolation cancel ) राहून कोरोनावर उपचार घेण्यास बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी दिली. यामध्ये विदर्भातील, वर्धा, अमरावती (amravati) आणि गडचिरोली (gadchiroli) या पाच जिल्ह्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर आता कोविड केअर सेंटरमध्ये (covid care center) उपचार घ्यावे लागणार आहेत. (home isolation is cancelled in five district of vidarbha)

अमरावतीमध्ये गेल्या पाच ते सहा दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या काही प्रमाणात घटली आहे. शहरी भागात रुग्णसंख्येवर नियंत्रण असले तरी ग्रामीण भागात आजही अनेक हॉटस्पॉट आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या बहुतांश रुग्णांकडून व त्यांच्या कुटुंबीयांकडून कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच नियम पाळले जात नसल्यानेच ही वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत असून होम आयसोलेशनचा पर्याय बंद करण्यात येत असल्याचे अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल म्हणाले. ग्रामीण भागात संशयित तसेच सौम्य लक्षणे असलेल्यांना व कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना घराऐवजी संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी आता ग्रामीण रुग्णालयात एक विशेष वॉर्डसुद्धा दिला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT