anil-deshmukh-new.jpg 
विदर्भ

गृहमंत्र्यांनी सांगितले आपत्तीच्या काळातील कारवाईचे सत्र!

सकाळ वृत्तसेवा

अकोला : राज्यात संचारबंदीचे कडक पालन व्हावे यावर शासनाने भर दिला आहे. संचारबंदीचे उल्लंघन केले म्हणून 57 हजार 517 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. क्वारंटाईन केले असतांनाही बाहेर फिरतांना आढळले म्हणून 572 लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे कायदा मोडणाऱ्यांवर आपत्तीच्या काळातच कारवाईचे सत्र सुरु असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी (ता. 20) येथे पत्रकार परिषदेत दिली. 

कोरोना सद्यस्थितीबाबत जिल्ह्याचा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी (ता. 20) आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की राज्यात सहा तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. त्यामुळे ते तुरुंग लॉकडाउन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार तुरुंगात बाहेरची कोणीही व्यक्ती आत जाणार नाही व आतली व्यक्ती बाहेर जाणार नाही. लॉकडाउन करण्यात आलेल्या तुरुंगांमध्ये औरंगाबाद, येरवाडा, ठाणे, ऑर्थररोड जेलसह इतर दोन तुरुंगांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय मानव संसाधन विकास माहिती तंत्रज्ञान,  इलेक्ट्रॉनिक्स दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलिस अधीक्षक अमोघ गावकर व इतर अधिकारी उपस्थित होते. 

काय केले सत्रात

  • सध्या समाज माध्यांवर चुकीची, खोटी माहिती पोस्ट करण्यात येत असून दोन समाजात तेढ निर्माण करुन वातावरण दुषित करण्यात येत आहे. त्यामुळे 242 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करुन 47 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
  • संचारबंदीचे उल्लंघन केले केल्याने 57 हजार 517 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून क्वारंटाईन केले असतांनाही बाहेर फिरतांना आढळून आलेल्या 572 लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
  • पोलिसांचा 100 या क्रमांकावर आतापर्यंत 74 हजार 344 कॉल या कालावधीत आले असून त्यांना मदत करण्यात आली आहे.
  • अत्यावश्यक आवागमनासाठी आतापर्यंत 2 लाख 17 हजार पासेस देण्यात आल्या आहेत. अवैधरित्या वाहतूक केल्याप्रकरणी 1051 गुन्हे करण्यात आले आहेत. 
  • विनाकारण संचारबंदीचे आदेश मोडून बाहेर फिरणाऱ्या 40 हजार 414 गुन्हे दाखल झाले असून आता तर त्यांचे वाहन ही जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,असेही गृहमंत्री. देशमुख यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

Monsoon Update: मान्सूनचा वेग मंदावला! देशातल्या १२ राज्यांतील ३१५ जिल्ह्यांवर दुष्काळाचे भीषण सावट

Tankerman Salman Pathan : गावचा पाणी पुरवठा झाला कमी; अगरवाडगावची तहान भागवतोय ‘टँकरमॅन’ सलमान

Forest Plantation: पुणे वनवृत्तात ४०८ हेक्टरवर ३० लाख रोपे; वनमहोत्सव २०२६ साठी वन विभाग सज्ज

SCROLL FOR NEXT