home quarantine patients roaming allover 
विदर्भ

दुसऱ्याच दिवशी पुसताता होम क्वारंटाईनचा शिक्का, म्हणचे गावभर फिरायला मोकळे...

राहुल खोब्रागडे

वर्धा : गृह विलगीकरणातील व्यक्तींच्या हातावर मारण्यात येणारा शिक्का विशिष्ट पद्धतीने दुसऱ्याच दिवशी पुसला जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे गृह विलगीकरणातील अनेक व्यक्ती घरात न थांबता आपली ओळख लपवून बाहेर पडत असल्याचे आढळून आले आहे. नियमांचे उल्लंघन करीत होत असलेली ही कृती कोरोना विषाणूच्या प्रसाराकरिता पोषक ठरणारी आहे.

कोरोना विषाणूची लागन होऊ नये, याकरिता जिल्हा प्रशासनाने अनेक उपाययोजना अंमलात आणत जिल्हा कोरोनामुक्त ठेवला आहे. जिल्ह्याला लागून असलेले इतर जिल्हे कोरोनाग्रस्त झाले आहेत. या जिल्ह्यांतून कोरोना विषाणूची लागन रोखण्याकरिता जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र आजही अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. अशा व्यक्तींना जिल्हा प्रशासनाकडून 14 दिवसांकरिता गृह विलगीकरणात ठेवण्यात येते. अशा व्यक्तींनी कोणत्याही नागरिकाच्या संपर्कात येऊ नये, अशा स्पष्ट सूचना आरोग्य विभागाकडून दिल्या जातात. असे असले तरी विलगीकरणातील व्यक्ती सतत कुटुंबातील सदस्यांच्या व परिसरातील इतर नागरिकांच्या सहज संपर्कात येत असल्याचे चित्र आहे.

अनेक नागरिकांच्या येतात संपर्कात

हातावर कोणत्याही पद्धतीचा गृह विलगीकरणात असल्याचा शिक्का दिसत नसल्याने परिसरातील नागरिकांना संशय येत नाही. त्यामुळे नागरिक कोणत्याही प्रकारची सुरक्षितता न बाळगता अशा व्यक्तींना आपल्याजवळ येऊ देतात, इतरांमध्ये मिसळू देतात. आतापर्यंत कोरोनामुक्त असलेला जिल्हा या चुकीमुळे कोरोनाग्रस्त होण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे. याबाबत कठोर नियम केले तरच जिल्हा कोरोनामुक्त ठेवता येईल; अन्यथा यातून मोठा धोका होण्याची शक्‍यता आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाने वेळीच दखल घेत अशा व्यक्तींना गृह विलगीकरणात न ठेवता सार्वजनिक स्थळी, शाळा, शिबिरात शासकीय निगराणीत ठेवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

आडमार्गाचा वापर

काही नागरिक जिल्ह्याच्या सीमा ओलांडून कोरोनाबाधित जिल्ह्यांत जात असून, तेथील व्यक्तींना घेऊन परत जिल्ह्यात येत आहेत. अनेकजण जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यातील नागरिकांच्या भेटीकरिता जात असल्याची माहिती आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद असतानाही हे घडत असल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. आडमार्गाने काही जण हे कृत्य करीत असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सूनच्या परतीला सुरुवात ! राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Spinach Oats Tikki: हेल्दी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांत बनवा हेल्दी अन् कुरकुरीत पालक-ओट्सची टिक्की

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

SCROLL FOR NEXT