file Photo 
विदर्भ

होमगार्डसला तीन महिन्यांपासून मानधनच नाही

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : बंदोबस्तात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून डोळ्यांत तेल घालून तैनात असलेल्या होमगार्डसला गेल्या तीन महिन्यांपासूनचे मानधनच मिळालेले नाही. याबाबत जिल्हा समादेशक कार्यालयात संपर्क साधला असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे होमगार्डचे म्हणणे आहे. परिणामी, दसरा अंधारात गेल्यानंतर आता होमगार्डची दिवाळी अंधारात जाण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 
शासनाकडून मागणी होताच पोळा, ईद, जन्माष्टमी, पोळा, मोहरम, गणपती, दुर्गादेवी बंदोबस्तात होमगार्ड जवान 12 तास शिस्तीने आपली सेवा देत असतात. ही मानसेवी सेवा असल्याने होमगार्ड यासोबतच खासगी क्षेत्रातही नोकरी करतात. बंदोबस्तासाठी बोलावल्यास कर्तव्यावर ते रुजू होतात. त्यामुळे त्यांच्या दररोजच्या कामावर सुटी घ्यावी लागत असल्याने त्या दिवसाचा पगार मिळत नाही. असे असताना बंदोबस्ताच्या कर्तव्यावर असलेले मानधन तीन ते चार महिन्यांपर्यंत मिळत नाही. यासंदर्भात जिल्हा समादेशक कार्यालयाकडून समाधानकारक उत्तरही मिळत नाही. कधी कधी वरिष्ठ अधिकारी मानसेवी होमगार्डला अपमानास्पद भाषेत बोलतात आणि अपमान करतात, असेही होमगार्डसनी सांगितले. 
ऑगस्ट महिन्यातील विविध सणांसह उत्सवांच्या वेळेस पाचशे ते सातशे होमगार्ड पोलिसांच्या सोबतीला बंदोबस्तात तैनात होते. त्या होमगार्डचे मानधन अद्याप मिळालेले नाही. या बंदोबस्तातील प्रत्येक होमगार्ड जवानाचे 15 ते 17 हजार रुपयांचे मानधन मागील महिन्यापासून झालेले नाही. त्यामुळे दसऱ्यानंतर होमगार्डसची दिवाळीही अंधारात जाण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. मात्र, होमगार्ड प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी 80 ते 90 हजारांपर्यंत आपले वेतन घेत आहेत. तसेच वेतनाच्या दीडपट दिवाळी बोनसही मिळणार आहे. त्यामुळे ते प्रशासकीय अधिकारी उत्साहात दिवाळी साजरी करतील. मानसेवी होमगार्ड जवानांचे मानधन दिवाळीपूर्वी न झाल्यास यांच्या कुटुंबीयांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT