चातगाव : आरोग्य कर्मचाऱ्यांना माहिती देताना डॉ. राणी बंग. 
विदर्भ

कोरोना विषाणू संसर्गावरील उपचारासाठी हे रुग्णालय झाले सज्ज

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : जगभर हाहाकार माजविणाऱ्या कोविड-19 म्हणजेच कोरोना या विषाणूजन्य आजाराने भारतातही थैमान घातले आहे. गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यास या आजाराबाबत आवश्‍यक ती खबरदारी घेऊन रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्च संस्थेचा मॉं दंतेश्वरी दवाखाना सज्ज झाला आहे.

विविध उपाययोजनांची पूर्वतयारी रुग्णालयाने केली असून त्या दृष्टीने कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.

तीन फूट अंतरावर डबे आखण्यात आले

कोरोना आजारांसंबंधी रुग्णांची जागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना, सर्व स्टाफचे प्रशिक्षण, स्वच्छता व देखरेख, आवश्‍यक साहित्य पुरवठा, रुग्ण नोंदणी अशा समिती गठित करण्यात आल्या आहेत. नोंदणी खिडकीच्या पुढे तीन तीन फूट अंतरावर डबे आखण्यात आले असून उपचारासाठी आलेल्या रुग्णांनी सुरक्षित अंतर ठेवण्याच्या सूचना नियमित दिल्या जात आहेत.

वाहनचालकाना प्रशिक्षण

या आजारांसंबंधी माहिती व आवश्‍यक काळजी घेण्यासंदर्भात उद्‌घोषणा सातत्याने दिल्या जात आहेत. कोरोना आजाराचे संशयित रुग्ण आढळल्यास त्यांना कसे हाताळायचे, डॉक्‍टर्स, परिचारिका व इतरही रुग्णालय स्टाफची काय भूमिका असेल, कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णाला गावातून आणायचे असल्यास वाहनचालकाने काय खबरदारी घ्यावी याचेही प्रशिक्षण चालकांना देण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

मेडिकलमध्ये औषधी घेताना तेथील स्टाफने काय काळजी घ्यावी यासंदर्भात सूचनाही देण्यात आल्या आहेत. सर्चच्या संचालक डॉ. राणी बंग आणि समन्वय समितीचे गटप्रमुख डॉ. योगेश काळकोंडे यांच्या नेतृत्वात डॉ. वैभव तातावार, डॉ. मृणाल काळकोंडे, डॉ. दत्ता भलावी, डॉ. मयूरी पेंदाम, डॉ. मयूर भानारकर आणि डॉ. स्मिता मोरे या वैद्यकीय चमूसह संपूर्ण स्टाफने उपचाराचे नियोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT