house construction incomplete due to lack of ramadi gharkul scheme fund in gadchiroli 
विदर्भ

निधी नसल्याने घरकुलांचे बांधकाम अर्धवट, इतक्या कडाक्याच्या थंडीत आम्ही राहायचे कुठे?

मनोजकुमार खोब्रागडे

वैरागड (जि. गडचिरोली) :  गरिबांना हक्कांचे घर मिळावे म्हणून सरकार प्रत्येक जातीसाठी वेगवेगळ्या योजनेतून घरकूल योजना राबवीत आहे. परंतु, रमाई योजनेसाठी सरकारकडे निधी उपलब्ध नसल्याने या योजनेतील लाभार्थ्यांच्या घरकुलांचे बांधकाम रखडले आहे. अनेकांची बांधकामे रखडल्याने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

ओबीसीसाठी प्रधानमंत्री, अनुसूचित जमातीसाठी शबरी, तर अनुसूचित जातीसाठी रमाई घरकूल योजना सरकार राबवीत आहे. प्रत्येक जातीसाठी निधीही उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेसाठी अनेकांनी आपली राहती घरे पाडून राहण्यासाठी झोपडीची व्यवस्था केली. त्यांचा संपूर्ण पावसाळा झोपडीत गेला. आता हिवाळाही सुरू झाला. परंतु, निधी उपलब्ध नसल्याने घरकुलांचे बांधकाम अर्धवटच राहिले. प्रधानमंत्री निधी व शबरी निधी लाभार्थ्यांना वेळेवर उपलब्ध होत आहे. परंतु, अनुसूचित जातीसाठीच्या रमाई घरकूल योजनेचा निधी उपलब्ध होत नसल्याने सरकार अनुसूचित जातीच्या लोकांप्रति उदासीन असल्याचे दिसून येते.

एकीकडे मागासवर्गीयांना जाहीर सभेतून, भाषणांतून गोंजारत आपले कसे प्रेम आहे हे दाखवायचे व योजना बंद करून त्यांना वाऱ्यावर सोडायचे, असे काम सरकार करीत असल्याचा आरोप होत आहे. रमाई घरकूल योजनेच्या लाभार्थी यादीत समावेश झाल्याने अनेकांना आता आपले घरकुलाचे स्वप्न पूर्ण होईल, असे लाभार्थ्यांना वाटले होते. पण, या योजनेतील निधीच मिळत नसल्याने त्यांचा स्वप्नभंग झाला आहे. भर पावसाळ्यात अनेकांनी गळक्‍या झोपड्यांमध्ये कसेबसे दिवस काढले. आतातरी आपले घरकूल पूर्ण होईल, अशी आशा लाभार्थ्यांना होती. पण, निधीच उपलब्ध होत नसल्याने त्यांचे घरकूल अपूर्णच राहिले आहे. प्रत्येकाला हक्काचे घर असावे म्हणून सरकार घरकूल योजना राबवीत आहे. परंतु, रमाई योजनेसाठी सरकारकडे निधी उपलब्ध नसल्याने घरकुलांचे बांधकाम रखडले असून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. 

वाळूच्या तुटवड्याची समस्या -
निधीअभावी घरकूल रखडले असताना वाळूच्या तुटवड्याची समस्याही भेडसावत आहे. मागील दोन वर्षांपासून वाळूघाटाचे लिलावच झाले नाही. त्यामुळे वाळू मिळत नाही. अनेक ठिकाणी तस्करीच्या मार्गाने मिळणारी वाळू दुप्पट, तिप्पट दराने विकली जाते. घरकूल लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी निधी दिला जातो. पण, सरकार देत असलेला निधी आधीच तोकडा असतो. त्यामुळे त्यात वाळूचा खर्च पूर्ण होत नाही. त्यामुळेही लाभार्थ्यांपुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT