How can they reach home? It is a question
How can they reach home? It is a question  
विदर्भ

लॉकडाऊनमुळे परगावी अडकलेल्यांना मुळगावी पोहोचवण्याची व्हावी व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा

गोंदिया :  लॉकडाउनमुळे स्थलांतरित मजूर, विद्यार्थ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून, त्यांना मुळगावी पोहोचविण्यासाठी विशेष व मोफत रेलगाड्या सुरू करण्यात याव्या, या मुख्य मागणीसह इतर मागण्या मंजूर करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कॉंन्सिल शिष्टमंडळाने केली. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविले.

कोरोना संकटाशी झुंजताना स्थलांतरित कामगार, विद्यार्थी, सुक्ष्म, लघु व मध्यम व्यावसायिक, शेतकरी, शेतमजुरांकडे विशेष लक्ष देण्यात येत नाही. तसेच राज्यांना आर्थिक अडचणीत ढकलणाऱ्या बॅंक, बुडव्या फरार गुन्हेगारांचा 68 हजार कोटी रूपयांचे कर्ज माफ करण्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता.4) भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देशव्यापी आंदोलन व मागणी दिन पाळण्यात आला.
लॉकडाउन काळात देशभरातील कोट्यवधी स्थलांतरित मजूर, विद्यार्थ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून, त्यांना मुळगावी पोहोचवण्यासाठी विशेष व मोफत रेलगाड्या सुरू करण्यात याव्या. देशाच्या विविध भागात अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यात यावी. कोरोनाची लाट थांबवण्यासाठी राज्याची थकबाकी, जीएसटी, राजकीय भेदभाव थांबविण्यात यावे. ग्रामीण अर्थ व्यवस्था व शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देण्याकरिता मनरेगाची कामे सुरू करण्यात यावी. मनरेगाची थकीत मजूरी देण्यात यावी. सर्व ग्रामीण व शहरी कष्टकऱ्यांच्या बॅंक खात्यात तातडीची मदत म्हणून 7 हजार रूपये जमा करावेत. शासनाच्या गोदामात असलेला धान्याचा साठा गरजूंना मोफत देण्यात यावा. तसेच आपला जीव धोक्‍यात घालून कार्यरत असलेले डॉक्‍टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, इतर आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी यांच्या जीविताची हमी सरकारने द्यावी. आदि मागण्या निवेदनात नमूद आहेत. निवेदन देतेवेळी शिष्टमंडळात भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा काऊंसिलचे सचिव का. मिलिंद गणवीर, जिल्हा सहसचिव का. रामचंद्र पाटील , राज्य काऊंसिल सदस्य का. करूणा गणवीर, सचिव मंडळ सदस्य का. परेश दुरूगकर, का.साजिद कुरेशी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT