farmer (1).jpg 
विदर्भ

मृत शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करायचे कसे?

अनुप ताले

अकोला : कर्जमुक्तीचा लाभ मिळवायचा असेल तर, पात्रता यादीतील शेतकऱ्यांना त्यांचे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. परंतु, हजारो शेतकऱ्यांचे मृत्यू पश्चात कर्जमुक्तीच्या पात्रता यादीत नाव आल्याने, त्यांचे आधार प्रमाणीकरण करायचे कसे? हा मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक, अनैसर्गिक संकटामुळे आर्थिक स्थिती बिकट झालेल्या शेतकऱ्यांना, चिंतामुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमुक्तीची घोषणा करुन मोठा दिलासा दिला. अल्पावधीतच घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना तयार करुन, शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्तीसुद्धा जाहीर केली. त्यानंतर प्रक्रिया गतीने राबवून जिल्हानिहाय पात्र शेतकऱ्यांच्या खात्याचे अपलोडीग करण्यात आले व विनाअवकाश कर्जमुक्तीसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या जाहीर सुद्धा करण्यात आल्या. परंतु, कर्जमुक्तीचा प्रत्यक्ष लाभ मिळविण्यासाठी पात्रता यादीतील शेतकऱ्यांना त्यांचे आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे असल्याचे, योजनेच्या अटीमध्ये नमूद आहे. मात्र या याद्यामधील हजारो शेतकरी हयात नसल्याने, त्यांचे आधार प्रमाणीकरण करायचे कसे? ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. संबंधित मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी स्वतःचे आधार प्रमाणीकरण करुन योजनेचा लाभ मिळविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे प्रमाणीकरण रिजेक्ट होत असल्याची बाब समोर आली आहे.

योजनेचा निश्चित लाभ मिळेल
कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्ज खात्याचे अपलोडींग करताना, मृत शेतकऱ्यांच्या वारसदाराच्या नावाचा समावेश करण्याचे निर्देश बँकांना दिलेले होते. परंतु, काही बँकांकडून मृत शेतकऱ्यांच्या नावाचे अपलोडींग करण्यात आल्याने, त्यांच्या कुटुंबियांचे आधार प्रमाणीकरण ऑनलाइन प्रोसेसमध्ये रिजेक्ट होत आहे. त्यामुळे संबंधित वारसदारांनी बँकामध्ये जाऊन, बँकाच्या निकषांची पूर्तता करुन दुरुस्ती करुन घ्यावी. समस्येचे निराकरण करुन योजनेचा निश्चित लाभ मिळेल.
- डॉ.प्रवीण लोखंडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था अकोला

शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसमोर मोठी समस्या 
कर्जमुक्तीच्या पात्रता यादीतील हजारो शेतकरी सध्या हयात नाहीत. त्यामुळे त्यांचे आधार प्रमाणीकरण होऊ शकत नाही. त्यांचे कुटुंबियांचे आधार प्रमाणीकरण ऑनलाइन सिस्टीम स्वीकारत नाही. कुटुंबियांना अधिकृत वारसपत्र सादर करण्यासाठी मोठा अवधी लागणार आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसमोर मोठी समस्या निर्माण झाली असून, याबाबत प्रशासनाने लवकर उपाय काढून, मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना चिंतामुक्त करावे.
- विजय देशमुख, शेतकरी जागर मंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market AI Rules: शेअर बाजारात AI च्या मदतीने ट्रेडिंग करताय? थांबा! गुंतवणुकीबाबत SEBIचा मोठा इशारा; जाणून घ्या नवे नियम

Koyna Dam Water level Update : महाबळेश्वर, नवजा अन् कोयनेत दमदार हजेरी; गेल्या 12 तासांत 'इतक्या' मिमी पावसाची नोंद, धरणाची स्थिती काय?

Latest Marathi News Live Update : उत्तराखंडमध्ये पावसाचा तडाखा; बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळून महाराष्ट्रातील भाविक अडकले

'वॉर्नरलाही जेजुरीचा भंडारा लावला होता' देवदत्त नागेने सांगितला परदेशातील भन्नाट किस्सा

Kolhapur ACB Trap : शाहूवाडीत PWD च्या शाखा अभियंत्याला 38 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'या' कामाच्या बिलासाठी मागितली होती रक्कम

SCROLL FOR NEXT