farmer (1).jpg 
विदर्भ

सांगा आता पीक कर्ज फेडायचे कसे?

अनुप ताले

अकोला : पावसाने थैमान घालत खरीप उद्‍ध्वस्त केला, रब्बी सुद्धा अवकाळी पावसाने फस्त केला. निम्म्याहून अधिक कापूस, तूर शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे आणि आता लॉकडाउनमध्ये मजूर आणि बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने, सर्वच पिके शेतात सडून खराब होत आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांचे अर्थचक्रच रुतून बसल्याने, पीक कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला आहे.

गेल्या काही वर्षांपासून दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि कीडीच्या प्रादूर्भावामुळे शेतकऱ्यांना सातत्याने नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या मोसमात पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक झाले परंतु, पावसाचा लहरीपणा, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यामुळे खरीप तसेच रब्बी हंगामातून शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरले नाही. कापूस, तूर, फुलशेती, फाजीपाला व फळपिकातून दोन्ही हंगामातील नुकसान भरपाई भरुन निघेल असा विश्वास शेतकऱ्यांना होता. मात्र अचानक उद्‍भवलेल्या कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी शासनाने लॉकडाउन केले आणि शेतकऱ्यांच्या सर्व शेतमाल शेतात व घरातच पडून राहाला. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अतिशय बिकट झालेली आहे. अशा स्थितीत बँकांकडून पीक कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांकडे तगादा सुरू आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र जून अखेरपर्यंत कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांना मूदत दिली. परंतु, खिशात दमडी नाही अन् कर्ज फेडायचे कसे, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

व्याज मात्र द्यावेच लागेल
आर्थिक स्थिती बिकट असल्याने व लॉकडाउनमुळे शेतकरी अडचणीत सापडल्याने, 31 मार्च ऐवजी 30 जूनपर्यंत पीक कर्ज फेडण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मुदतवाढ दिली. परंतु, जून अखेर कर्जाची परतफेड करतील, त्यांना तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर फक्त बँकेमार्फत व्याज सवलत देण्यात येणार असून, केंद्र शासन व राज्य शासनाद्वारे व्यास सवलत जाहीर झाली नसल्याने, सभासद शेतकऱ्यांला प्रचलित दराने व्याजाचा भरणा करावा लागणार आहे. मात्र वाढीव कालावधीत व्याज परतावा सवलत लागू करण्यात आल्यास व्याजाची रक्कम सभासदास परत करण्यात येणार असल्याचे,  बँक प्रशासनाने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT