अमरावती ः बोर्डाचे अध्यक्ष श्री. गोसावी यांना निवेदन देताना विजुक्‍टाचे पदाधिकारी.
अमरावती ः बोर्डाचे अध्यक्ष श्री. गोसावी यांना निवेदन देताना विजुक्‍टाचे पदाधिकारी.  
विदर्भ

बारावीची पेपर तपासणी वांध्यात

सकाळवृत्तसेवा

अमरावती ः इयत्ता बारावीचा निकाल यंदा लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. विदर्भ ज्युनिअर टीचर्स असोसिएशने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी असहकार आंदोलन पुकारले आहे. शिक्षकांनी पेपर तपासणीत असहकार करण्याची भूमिका घेतल्याने अमरावती विभागातील जवळपास 9 लाख उत्तरपत्रिका तपासणीची कामे खोळंबण्याची शक्‍यता आहे.
शासनाच्या शिक्षणविरोधी धोरणामुळे बाजारू शिक्षण व्यवस्थेला प्रोत्साहन मिळत आहे. विनावेतन शिक्षकांना वेठबिगारीसारखे काम करावे लागत आहे, असा आरोप विजुक्‍टाने केला आहे. शिक्षकांच्या मागण्यांबाबत सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करीत नसून नाइलाजास्तव बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका तापसणीबाबत असहकार करावा लागत असल्याचे विजुक्‍टाचे अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे यांनी सांगितले. या असहकार आंदोलनाचा परिणाम राज्यातील 14 लाख विद्यार्थ्यांच्या 91 लाख तसेच अमरावती विभागातील 9 लाखांपेक्षा अधिक उत्तरपत्रिकांच्या तपासणीवर होणार आहे. निवडश्रेणी सरसकट लागू करणे, 360 शिक्षकांच्या पदांना तातडीने मान्यता देणे, शिक्षक भरती करणे, स्वयंअर्थसाहाय्यित शाळांना मान्यता देणे बंद करणे यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. यासंदर्भात अमरावती विभागीय बोर्डाचे अध्यक्ष श्री. गोसावी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी डॉ. अविनाश बोर्डे, प्रा. विनय काळे, प्रा. सुधाकर गावंडे, प्रा. सुमेध हजारे, प्रा. किशोर चाफले, प्रा. राजेंद्र राऊत, प्रा. प्रवीण मनवर, प्रा. सहदेव सोळंके, प्रा. दिलीप वडते, प्रा. विनोद बिजवे, प्रा. ललित जावरकर, प्रा. महेश बेलसरे आदी उपस्थित होते.
नियामकांच्या सभेवर बहिष्कार
इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिकेबाबत शनिवारी (ता. 23) नियामकांची (मॉडरेटर्स) सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र असहकार आंदोलनामुळे ती रद्द करण्यात आली. उद्यापासून होणाऱ्या सर्व विषयांच्या नियामकांच्या सभांवर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचे डॉ. बोर्डे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT