File photo
File photo 
विदर्भ

हुक्‍का पार्लर चालकांना वेसण

नीलेश डोये

नागपूर, ता.5 : बिधनास्त हुक्का पार्लर थाटून तरुणांना व्यसनी करणाऱ्या हुक्का पार्लर चालकांना सरकारने चांगलाच दम दिला आहे. हुक्का पार्लर सुरू असल्याचे आढळल्यास मालकाला तीन वर्षांच्या कारावासासोबत एक लाखांचा दंड केला जाणार आहे. तशी तरतूदच कायद्यात करण्यात आली आहे. हुक्का पार्लरचा व्यवसाय आणि त्यामुळे होत असलेल्या नुकसानासंदर्भात "सकाळ'ने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत शासनाने हुक्‍का पार्लर, बारला कायद्याचे वेसण घातले आहे.
हुक्का पार्लरचे चलन चांगलेच वाढले आहे. खासकरून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये याची चांगलीच क्रेझ आहे. तरुणच नव्हे तर तरुणीही हुक्‍क्‍याच्या आहारी गेल्या आहेत. हुक्‍क्‍याचे साहित्याची ऑनलाइनेही विक्री होत आहे. कायद्याचा कुठलाच धरबंध नसल्याने अनेकांनी हुक्का पार्लरचा व्यवसाय सुरू केला. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसारख्या शहरात हुक्का पार्लरचे अमाप पीक आले आहे. हुक्‍क्‍याच्या धुरामुळे अनेकांच्या आयुष्याचे नुकसान झाले. हुक्‍क्‍यात ड्रग्स, गांजासारखे नशेचे पदार्थ मिसळवल्या जात असल्याने अनेकजण व्यसनी झाले आहे. पोलिसांतर्फे हुक्‍का पार्लरवर कारवाई केली जात होती. मात्र, कायद्यात कोणत्याही प्रकारची ठोस तरतूद नसल्याने ते सुटून जातात. कायद्याचा धाक नसल्याने हुक्का पार्लर चालक बिनधास्त झाले होते. हुक्‍का पार्लरला कायद्याची वेसण घालण्यासाठी अनेकांनी मागणी केली. नागपूर महानगरपालिकेत यांसदर्भातचा ठराव घेण्यात आला होता.
सरकारचा अध्यादेश
कायद्यानुसार हुक्का पार्लर, बार चालकांना किमान एक ते तीन वर्षांपर्यंत शिक्षा होणार आहे. तसेच 50 हजार ते एक लाख रुपयापर्यंत दंड होणार आहे. तशी तरतूद सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम 2003 मध्ये नव्याने करण्यात आली आहे. 4 ऑक्‍टोबरला या संदर्भात अध्यादेश काढण्यात आला आहे. यानुसार हुक्का बारसाठीची सर्व साधने आणि साहित्य जप्त करण्याचे अधिकार पोलिसांना मिळाले आहे. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांना करता येणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT