Human Trafficking girl woman sailing crime steroid  
विदर्भ

कोवळ्या कळ्यांवर ‘स्टेरॉईड’चा भडिमार !

मनीषा मोहोड-येरखेडे

नागपूर - ज्या वयातील मुली घरातील अंगणात खेळतात, परिसरात त्यांच्या हसण्याचा, दंगा मस्ती करण्याचा आवाज घुमतो... त्याच वयातील अनेक निराधार, अनाथ वा परिस्थितीमुळे आईवडिलांनीच दलालाला विकलेल्या अनेक कोवळ्या कळ्या जगातील एका कोपऱ्यात ‘स्टेरॉईड’ या घातक औषधांच्या भडिमारात कुसकरल्या जात आहेत. मानवी तस्करीतील हे सर्वांत भयानक आणि अंगावर शहारे आणणारे सत्य या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींच्या पाहणीत पुढे आले आहे.

नागपूर शहरात मानवी तस्करीचे मोठे रॅकेट कार्यरत आहे. लहानपणीच कुटुंबातील सदस्य मुलींची विक्री करीत असल्याची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. बदलापूरवरून महाराष्ट्रात आणलेल्या १० ते १२ वर्षांच्या मुलींची वाढ वेगाने व्हावी यासाठी ‘हार्मोन’चे इंजेक्‍शन देऊन त्यांची इतरत्र विक्री केली जात असल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. विक्री होत असलेल्या ३० ते ४० टक्के मुली अन्य राज्यांतील असल्या तरी ६० टक्के मुली महाराष्ट्रातीलच आहेत. शहरातील जरीपटका, बेझनबाग, हुडकेश्‍वर, भंडारा, चंद्रपूर येथील विधवा स्रिया, गरीबीने बेजार, अशिक्षित तसेच आमिषाला बळी पडलेल्या स्रियांची विक्री झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मानवी तस्करीमध्ये सर्वाधिक मुली या दहा ते चौदा वयोगटात ढकलल्या जातात. या मुलींची शारीरिक वाढ करण्यासाठी ‘स्टेरॉईड’ या वापर गोळ्या अथवा इंजेक्‍शनच्या माध्यमातून केला जातो. विशेषः म्हणजे या औषधीने तुम्ही छान, सुंदर दिसणार असे सांगून दलालामार्फत या मुलींना गोळ्या घेण्यास प्रवृत्त केले जाते. परंतु, ‘स्टेरॉईड’ हे सायलेंट किलरप्रमाणे या मुलींच्या शरीरात काम करते. त्यांची शारीरिक वाढ होत असली तरीही हाडांची वाढ होत नाही. या औषधांमुळे वाढीच्या नैसर्गिक प्रक्रियेत अडचण निर्माण होऊन त्यांना मधुमेह, हाडे ठिसूळ होणे, मेंदूचे विकार अशा गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते, असे वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. 

आदिवासी महिलांचे प्रमाण अधिक  
मानवी तस्करीला बळी पडलेल्या महिलांमध्ये ७० टक्के स्त्रिया या ग्रामीण भागातून आलेल्या व अशिक्षित असतात. जवळपास ७८ टक्के स्त्रिया पश्‍चिम बंगालमधून आलेल्या असतात. भारतात ९० टक्के मानवी व्यापार हा देशाअंतर्गत होतो व त्यात प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांचा समावेश अधिक असतो, असे यासंदर्भातील अहवालात म्हटले आहे. याच अहवालानुसार महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकमधील सेक्‍स रॅकेटमध्ये सापडलेल्या मुलींमध्ये पूर्वाचलातील राज्यांमधून आलेल्या मुली सर्वांत जास्त आहेत.

शहरनिहाय भिन्न भागात विक्री 
आतापर्यंत भारतात मानवी व्यापाराचे नेमके प्रमाण किती आहे हे कळू शकलेले नाही कारण हजारो प्रकरणे नोंदविले जात नाही. तरीदेखील कर्नाटक, झारखंड, पश्‍चिम बंगाल, बिहार, आसाम, नागालॅंड, मिझोरम या राज्यांमध्ये हे प्रमाण खूप गंभीर आहे. तसेच महाराष्ट्राचाही यात समावेश असून, कर्नाटकात सांगली, कोल्हापूरच्या मुली सापडतात. तसेच आंध्रमध्ये वणी, चंद्रपूर, यवतमाळ, मध्य प्रदेशात नंदुरबार, धुळे, बांगलादेशात नागपूर, विदर्भ पट्ट्यातील आदिवासी आणि निराधार मुली छत्तीसगड, पश्‍चिम बंगाल, ओडिशा या भागात विकल्या जातात.

शारीरिक वाढीसाठी ‘स्टेरॉईड’चा वापर केला जातो. हे घटक गोळ्या वा इंजेक्‍शनमधून देण्यात येतात. याच्या अतिवापरामुळे शरीरातील मांसल भागाची वाढ होते. मूळ घटक वा हाडांची वाढ अजिबात होत नाही. यामुळे या महिलांना पुढे मधुमेह, हाडांची झीज, मेंदूचे विकार, हृदयविकार यासारख्या व्याधींचा सामना करावा लागतो. - डॉ. सुषमा देशमुख, स्री व प्रसूतीरोगतज्ज्ञ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Loan Waiver : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात जमा होणार पैसे; 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, बँक खात्यांची पडताळणी सुरू

Pune Metro: आता रस्ता ओलांडणे झाले सुरक्षित! वाकड मेट्रो स्थानकावर ६० मीटरचा पादचारी पूल; नागरिकांसाठी मोफत सुविधा

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

Wedding Destination: शोधताय? हिमालयाच्या कुशीतलं हे मंदिर बनतंय नवविवाहितांचं आवडतं ठिकाण, जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Vaibhav Sooryavanshi : वैभवसाठी संजू सॅमसनला बळीचा बकरा का बनवताय? माजी खेळाडूचा संतापजनक सवाल...

SCROLL FOR NEXT