hunters are behind Scaly cats in Gadchiroli
hunters are behind Scaly cats in Gadchiroli  
विदर्भ

गडचिरोलीत दुर्मीळ वन्यजीव धोक्‍यात! खवले मांजर तस्करांच्या रडारवर; संरक्षण गरजेचे

मिलिंद उमरे

गडचिरोली : एखाद्या चिलखताप्रमाणे अंगभर खवले पांघरूण फिरणाऱ्या अतिदुर्मीळ प्रजाती असलेल्या खवले मांजरावर वन्यजीव तस्करांची वक्रदृष्टी फिरल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात खवले मांजर आढळत असून येथून या वन्यजीवाच्या तस्करीचे गुन्हे उघडकीस आल्याने यामागे तस्करांची मोठी टोळी असण्याचा संशय वन्यजीव अभ्यासक व्यक्त करीत आहेत.

राज्यातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात रानम्हशी, राज्यप्राणी असलेला शेकरू, आग्या मण्यार साप, मलबार धनेश या दुर्मीळ जिवांसह खवले मांजरही आढळून येतो. गेल्या काही वर्षांत देशात या दुर्मीळ वन्यजीवाच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच गडचिरोली जिल्ह्यातून अशा घटना उघडकीस येत असल्याने तस्करांनी आपले लक्ष या जिल्ह्यावर केंद्रित केले असावे, अशीही शक्‍यता नाकारता येत नाही. 

काही महिन्यांपूर्वी आलापल्ली वनविभागाने खवले मांजराची तस्करी करणाऱ्या आरोपींना अटक केली होती. १२ डिसेंबर २०२० रोजी गडचिरोली शहरातील एका घरात खवले मांजर आढळून आले होते. 

प्रजासत्ताकदिनी गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने चामोर्शी पोलिस स्टेशनअंतर्गत कुदरसी टोला येथे खवले मांजरासह त्याची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक केली होती. विशेष म्हणजे यातील दोन आरोपी उत्तर प्रदेशातील आहेत. ते अनेक वर्षांपासून येथे राहत असले तरी, या तस्करीचे धागेदोरे उत्तर प्रदेशसह इतर राज्यातसुद्धा असू शकतात. पोलिसांनी राजू आंदुलान घोती, इरफान इनीयास सैफी रा. धुंगराला (उत्तर प्रदेश) व त्याचा साथीदार शकील बाबू सैफी रा. सलाई, ता. जि. हापूर (उत्तर प्रदेश) याला अटक केली. त्यामुळे जिल्ह्यातील खवले मांजरांची तस्करी करणाऱ्या अशा अनेक टोळ्या सक्रिय असू शकतात.  

अभ्यास गटाने लक्ष द्यावे

राज्यातील खवले मांजरांच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या उपाययोजना सुचविण्यासाठी पुण्याचे वनसंरक्षक (वन्यजीव) रमेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली वनविभागाने अभ्यासगट स्थापन केला आहे. हा अभ्यासगट खवले मांजर प्रजातीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आवश्‍यक असलेला कृती आराखडा तयार करून राज्य शासनास सादर करणार आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशावरून हा अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे. या अभ्यासगटाने राज्यातील इतर भागात खवले मांजरांचा अभ्यास करताना ज्या गडचिरोली जिल्ह्यात सध्या खवले मांजरांच्या तस्करीच्या घटना घडत आहेत, तिथे अधिक लक्ष देऊन संरक्षणाच्या उपाययोजना सुचविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
 
संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: झुंझार अर्धशतक करणारा ऋतुराज झाला क्लिन-बोल्ड, एमएस धोनीची मैदानात एन्ट्री

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT