The husband also lost his life due to the shock of his wifes death in Bhandara 
विदर्भ

एकमेकांच्या सोबतीने जीवन जगत असताना पत्नीने साथ सोडली; मग, पतीनेही सोडले प्राण

मोहित खेडीकर

लाखनी (जि. भंडारा) : एकमेकांच्या सोबतीने जीवन जगत असताना अचानक पत्नीने साथ सोडली. आपल्या जीवनसंगिनीने साथ सोडल्याचे कळताच पतीनेही प्राण सोडले. पहाटे घडलेल्या या घटनेने गोंडसावरी हळहळली.

लाखनीपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या गोंडसावरी गावातील ग्रामस्थांसाठी बुधवारची सकाळ दुःखद बातमी घेऊन आली. गावातील नारायणराव भोंडे (वय ८५) व फिफुलाबाई भोंडे (वय ८०) यांचे पहाटेच्या सुमारास अचानक निधन झाले. पहाटे फिफुलाबाई यांना अचानक अस्वस्थ वाटायला लागले. घरातील सदस्यांनी धावाधाव सुरू केली. मात्र, काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला.

पहाटे-पहाटे सुरू झालेल्या कुटुंबीयांच्या धावपळीमुळे नारायणरावांची झोप उघडली. आपल्या जीवनसंगिनीचा मृत्यू झाल्याचे कळताच तेही पुरते खचले. कालपर्यंत एकमेकांच्या आधाराने जगताना म्हातारपणातही हिंमत होती. मात्र, पत्नीचे निधन झाल्याचे दुःख पतीला असह्य झाले. काही वेळातच त्यांनीदेखील जगाचा निरोप घेतला.

आईपाठोपाठ वडिलांनीदेखील जगाचा निरोप घेतल्याने मुलालासुद्धा काही सुचेनासे झाले. तरीदेखील ओढवलेल्या परिस्थितीला सामोरे जात भोंडे कुटुंबीयांनी दोघांचेही सोबतच अंत्यसंस्कार पार पाडले.

गाव गहिवरले

गावातील वृद्ध दाम्पत्याचा सोबतच मृत्यू झाल्याच्या घटनेने गोंडसावरीतील ग्रामस्थ हळहळले. या घटनेमुळे कोणीही कामावर गेले नाही. सर्वत्र स्मशानशांतता पसरली होती.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Central Park: महालक्ष्मी रेसकोर्सचा कायापालट होणार, भव्यदिव्य सेंट्रल पार्क उभारणार; एकनाथ शिंदे यांनी प्लॅनच सांगितला

IPL 2026 Auction live : लिलावापूर्वी BCCI ची 'गुगली'! परदेशी खेळाडूंसाठी निश्चित केली Salary Cap; जाणून घ्या बदललेला नियम

Jio Recharge Offer : महिन्याचा रीचार्ज फक्त ₹103! मोफत OTT आणि AI सब्स्क्रिप्शन; Jio चे Happy New Year साठी 3 जबरदस्त प्लॅन

Chandrapur : माणुसकीला काळिमा फासणारी घटना! कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला विकायला लावली किडनी; सावकारकीचा अमानवी चेहरा समोर..

Indigo Airlines : इंडिगो विमान तब्बल चार तास उशिरा; 21 मंत्री, आमदारांची मोठी गैरसोय, 'इंडिगो'बाबत नेमकं घडतंय काय?

SCROLL FOR NEXT