lightning 
विदर्भ

बाळाच्या घाईने पती-पत्नी भरपावसात घराकडे निघाले; अन् नियतीने डाव साधला 

राहुल मैंद

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : ब्रह्मपुरीवरून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पारडगाव येथे दुचाकी वाहनाने जात असताना अचानक वीज कोसळली. या घटनेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी, १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमाराला घडली. पिंटू मोतीराम राऊत (वय ३२) आणि पत्नी गुंजन राऊत (वय २७) असे मृतकांची नावे आहेत.

पती पिंटू आणि पत्नी गुंजन हे पारडगावाचे रहिवासी आहेत. दो वर्षांपूर्वी पिंटू आणि गुंजनचा विवाह झाला होता. त्यांना दीड वर्षांचा मुलगा सुद्धा आहे. पिंटू भिवंडीला (मुंबई) नोकरीला होता. त्याची पत्नी गुंजन सासरी लहान मुलगा आणि सासूसोबत राहत होती.

टाळेबंदी उठल्यानंतर पिंटू काही दिवसांसाठी गावाला आला होता. दोन दिवसांनी त्याला पुन्हा भिवंडीला जायचे होते. शुक्रवारी पती-पत्नी ब्रह्मपुरी येथे काही कामानिमित्त दुचाकी वाहनाने आले होते. काम आटोपून घराकडे निघणार तोच मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. 

पाऊस कमी होण्याची वाट पाहतो तर घरी लहान मुलगा एकटाच होता. आपले बाळ आपली वाट पाहत रडत असेल या विचाराने दोघांनीही भर पावसातच गावाला जायचा निर्णय घेतला. त्या बिचाऱ्या जिवांना काय माहीत की रस्त्यात आपल्यासाठी नियती एक वेगळाच खेळ खेळणार आहे म्हणून.

अंगावर पावसाच्या धारा झेलत बाळाच्या ओढीने दोघेही पती-पत्नी दुचाकीवरून आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाले. गावाकडे परत जात असताना उदापूरजवळील अंजली राइस मिलनजीक अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यात दोघांचाही घटनास्थळावरच मृत्यू झाला. दोघांच्याही अचानक मृत्यूने पारडगावात शोककळा पसरली आहे.
 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Pune Mega Plan : पुण्याचा २०३६ चा मेगा प्लॅन विकास आराखडा तयार : अर्थव्यवस्था २२० अब्ज डॉलर करण्याचे उद्दिष्ट

Solapur Farmer Loan Waiver : 59 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; त्रुटी दूर, नवीन यादी लवकरच होणार जाहीर, आतापर्यंत 30 हजार 500 शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Election Symbol Controversy : निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आता काय उरते?; हायकोर्टाचा सवाल

SCROLL FOR NEXT