विदर्भ

रात्री जेवण केल्यानंतर पत्नीसोबत झाला वाद; रागात केला खून

शब्बीर खान

बाभूळगाव (जि. यवतमाळ) : रात्री जेवण केल्यानंतर पत्नीसोबत झालेल्या वादात रागाच्या भरात पतीने लाकडी दांड्याने डोक्यावर प्रहार करून पत्नीचा खून केला. ही घटना शनिवारी (ता. तीन) मध्यरात्रीनंतर घारफळ शिवारात असलेल्या शेतातील घरामध्ये घडली. शांता सुरेश पाटणकर (वय ४०) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी भास्कर सोभाजी वैद्य (वय ४५) याने बाभूळगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंद करून सुरेश सानू पाटणकर (वय ४५) यास अटक करण्यात आली. (Husband-murders-wife-in-Gharphal-Shivara-of-Yavatmal)

शेतकरी संजय राठी यांच्या शेतातील बंड्यावर असलेल्या घरामध्ये सुरेश पाटणकर हा पत्नी शांतासोबत अनेक दिवसांपासून शेतीच्या कामासाठी मुक्कामी राहत होता. हे कुटुंब मूळचे अमरावती जिल्ह्यातील जुतपाणी येथील रहिवासी आहे. शनिवारी मध्यरात्री सुरेश याने पत्नीसोबत वाद करून खून केला. या घटनेने भास्कर वैद्य पार भांबावून गेला. त्याने याबाबतची माहिती भ्रमणध्वनीवरून शेतमालकाला सांगितली. त्यावरून शेतमालक संजय राठी यांनी गावातील आणखी काही लोकांना सोबत घेऊन शेतात जाऊन पाहण्यास सांगितले.

त्यानुसार नागरिकांनी घरात जाऊन पाहणी केली असता शांता पाटणकर खोलीत मृतावस्थेत पडून होती. या घटनेची तक्रार भास्कर वैद्य याने रविवारी (ता. चार) पहाटे पोलिस ठाण्यात दिली. पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला व सुरेश पाटणकर यास ताब्यात घेतले. मृतदेह बाभूळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

(Husband-murders-wife-in-Gharphal-Shivara-of-Yavatmal)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT