If the payment is not made within fortnight the crop insurance company will be besieged 
विदर्भ

शेतकऱ्यांसाठी भावना गवळी यांनी दिला इशारा; काय म्हणल्या खासदार?

सूरज पाटील

यवतमाळ : अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कापूस, सोयाबीनचा तर लागवड खर्च सुद्धा निघणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत पीकविमा कंपन्यांनी बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांना पीकविमा दिला आहे. जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असल्यामुळे विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना पीकविमा नुकसानभरपाई देण्यात यावी अन्यथा पीकविमा कंपनीला घेराव घालू, असा इशारा खासदार भावना गवळी यांनी दिला आहे. त्या पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होत्या.

कोरोनामुळे राज्याचीच नव्हे तर जगाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर कोरोना पाठोपाठ अतिवृष्टीचे संकट आले. शेतकऱ्यांच्या शेतातील फळे, भाजीपाला आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले.

त्यानंतर संततधार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या लाखो हेक्टर जमिनीवरील सोयाबीन, धान, मका, कापूस, ज्वारी, तूर, या पिकांचे नुकसान झाले. परतीच्या पावसाने तर कहरच केला. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिकही परतीच्या व ढगफुटीच्या पावसाने नष्ट झाले.

शेतकरी हा नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास आर्थिक मदत मिळावी व झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी पीकविमा काढत असतो. यवतमाळ जिल्ह्यातील चार लाख ६७ हजार २११ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा काढला आहे. यासाठी केंद्र शासन, राज्य शासन तसेच शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे ३५ कोटी ७५ लाख १ हजार २५१ रुपयांचा विमा हप्ता भरला.

यवतमाळच्या कृषी विभागाने सुद्धा जिल्ह्यातील साडे चार लाख शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधीत झाल्याचा अंदाज प्राथमिक सर्वेक्षणात नोंदविला आहे. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना पीकविमा नुकसान भरपाई देण्याची मागणी खासदार भावनाताई गवळी यांनी केली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT