hardware-shop 
विदर्भ

दुकान लगाना है, तो हप्ता देना पडेगा...! 

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : शहरातील जामनकर नगरातील आठवडी बाजारात आपले हार्डवेअरचे दुकान लावलेल्या एका व्यापाऱ्याच्या दुकानातील सामानांची स्थानिक गुंडांनी नासधूसकेली. घेतलेल्या सामानांचे पैसे मागितले असता शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यावरच ते थांबले नाही तर, "ये एरिया में दुकान लगाना है तो पांचसों रुपये हप्ता देना पडेगा', अशी ताकीद दिली. ही घटना रविवारी (ता.23) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी

यवतमाळ शहरातील इंदिरानगर भागात राहणाऱ्या मो. रफीक मो. शफीक यांचा हार्डवेअरचा व्यवसाय आहे. दर रविवारी जामनकर नगरातील आठवडी बाजारात ते आपले दुकान लावतात. या रविवारीसुद्धा नेहमीप्रमाणे त्यांनी बाजारात आपले दुकान लावले होते. सायंकाळनंतर दुकानातील सामानांची आवराआवर करून दुकान बंद करीत असताना जामनकर नगरात गुंडांचे टोळके आले. या टोळक्‍यातील संशयित सचिन राठोड याने मो. रफीक मो. शफीक यांच्या दुकानातील पाना-पेचकस उचलला आणि त्यांच्याकडे रागाने बघू लागला. सामान घ्यायचे आहे काय, असे मो. रफीक मो. शफीक यांनी त्याला विचारले असता तो सामान घेऊन निघून जाऊ लागला. मो. रफीक मो. शफीक यांनी सामानाचे पैसे मागताच सचिन राठोड याने शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. 

सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

"इधर हमसे पुछे बगैर दुकान लगाने का नही'. दुकान लावायचे असेल तर पाचशे रुपये हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी दिली. तसेच टोळक्‍यातील इतरांनी दुकानातील सामानांची नासधूस करून दहा हजार रुपयांचे नुकसान केले. त्याचप्रमाणे इतरांच्याही दुकानाची नासधूस केली. मो. रफीक यांनी गुरुवारी (ता.27) अवधूतवाडी पोलिस ठाणे गाठून झालेल्या घटनेची तक्रार दिली. त्यावरून सचिन राठोड (वय 30), सलमान बिहारी (वय 26), शाहरुख देडी (वय 27, सर्व रा. जामनकर नगर) यांच्यासह अन्य सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Mandir Donation Details: चार वर्षांत अयोध्येतल्या राम मंदिराला किती दान मिळालं? सोनं आणि पैसा बघून बसेल धक्का!

IND vs AFG 3rd ODI: रोहित - जैस्वालने एकही चेंडू न खेळताही भारताला मिळाल्या ५ धावा, पण का? जाणून घ्या खरं कारण

Dombivli: राज ठाकरे आणि मराठी माणसांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, मनसे आक्रमक; संबंधिताविरोधात एनसी दाखल

Raigad Drone Row: रायगडावर शिवप्रेमींच्या नैसर्गिक विधीचे ड्रोन चित्रीकरण; लौकिक गोळे यांच्यावर आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

Omraje Nimbalkar : पवनराजे हत्या प्रकरणाच्या निकालाबाबत उच्च न्यायालयात जाणार

SCROLL FOR NEXT