Illegal Money Lender Grab Farms Farmer end his life yavatmal crime police action sakal
विदर्भ

Yavatmal Crime : शेत बळकावण्याचा अवैध सावकाराचा घाट; शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा, पीडित कुटुंबाची न्यायासाठी पायपीट

राळेगाव तालुक्यातील एका अवैध सावकाराने शेतजमीन बळकावण्याचा घाट घालून अरुण नांदे या शेतकऱ्याला मारहाण

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : राळेगाव तालुक्यातील एका अवैध सावकाराने शेतजमीन बळकावण्याचा घाट घालून अरुण नांदे या शेतकऱ्याला मारहाण केली. त्यामुळे घाबरलेल्या नांदे यांनी १३ ऑगस्ट रोजी जीवनयात्रा संपविली. आत्महत्येपूर्वी सातवीत शिक्षण घेणाऱ्या मुलाच्या हातून चिठ्ठी लिहून घेऊन त्यात नांदे यांनी सावकाराचा स्पष्ट उल्लेख केला आहे. याप्रकरणी राळेगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राळेगाव तालुक्यातील शेळी येथील रहिवासी असलेल्या अरुण नांदे यांच्याकडे आठ एकर शेती होती. राळेगाव पोलिस ठाण्यात नांदे यांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार नांदे यांनी तीन एकर शेतीवर २०१३मध्ये नापिकी व आजारपणासाठी सावकार दिलीप नगराळेकडून दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या बदल्यात तीन एकर शेतीची खरेदी करून दिली. पैसे परत मिळाल्यानंतर जमीन परत देईल, असा शब्द नगराळे यांनी दिला होता.

पाच वर्षांत नांदे यांनी व्याजासह रक्कम परत करूनही सावकार जमीन परत देण्यास तयार नव्हता. जमिनीचा ताबा अजूनही अरुण नांदे यांच्याकडेच आहे. मात्र, सरकारकडून मिळणारी नुकसान भरपाई सावकारच उचलत होता.

काही दिवस अगोदर सावकाराने शेतात येऊन अरुण नांदे यांना मुलासमक्ष मारहाण केली व कुटुंबासह मारून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून अरुण नांदे यांनी १३ ऑगस्टला शेतातच आत्महत्या केली, असे तक्रारीत नमूद आहे. मृत अरुण नांदे यांच्यामागे पत्नी, दोन मुले असा आप्त परिवार आहे.

दरम्यान अवैध सावकाराने शेती बळकावल्याचे प्रकरण राळेगाव येथील उपनिबंधक कार्यालयात सुरू आहे. या प्रकरणी न्याय मिळवून देण्यात यावा, अशी मागणी चंदा नांदे यांनी सावकारग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे प्रा. घनश्याम दरणे यांच्याकडे केली आहे.

तालुका उपनिबंधक व जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दाखल शेतकऱ्यांचे अवैध सावकारीबाबतचे खटले इतर कामांच्या बोजामुळे लवकर मार्गी लागत नाहीत. सावकार सारखा तगादा लावतो, खोट्या केसेस लावतो, मारहाण करतो. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करतात. अरुण नांदे यांच्या आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी करून त्यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा.

- प्रा. घनश्याम दरणे, अध्यक्ष, सावकारग्रस्त शेतकरी संघर्ष समिती, यवतमाळ.

अरुण नांदे यांच्या मृत्यूची राळेगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबाचा जबाब नोंदविण्यासाठी बोलावण्यात आले होते.नांदे यांनी लिहिलेली चिठ्ठी उशिरा सापडली. त्यामुळे आतापर्यंत गुन्हा नोंदविण्यात आला नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. काही निष्पन्न झाल्यास गुन्हा नोंदविण्यात येईल.

- रामकृष्ण जाधव, ठाणेदार, राळेगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT