Implements good ideas for tourism in Amravati  
विदर्भ

पर्यटन विकासासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना राबवा; पालकमंत्र्यांकडून पर्यटन विकासाचा आढावा

राजू तंतरपाळे

अमरावती  : वनसंपदेने नटलेल्या अमरावती जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या मोठ्या शक्‍यता आहेत. त्यानुसार वनांचे संवर्धन, स्थानिकांना रोजगार आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

जिल्ह्यातील पर्यटन विकासकामांचा आढावा पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सोमवारी (ता. सात) जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंत वानखडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह वनविभागाचे विविध अधिकारी या वेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, की जिल्ह्यात वनांप्रमाणेच प्राचीन, धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेली अनेक स्थळे आहेत. त्यामुळे सर्वंकष विचार करून सविस्तर आराखडा करावा. पर्यटनाला चालना देत स्थानिकांना रोजगार मिळवून द्यावा, त्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात. 

जिल्ह्याच्या ठिकठिकाणच्या प्रवेशस्थानी संपूर्ण पर्यटनस्थळाची व उपक्रमाची माहिती देणारे बोर्ड लावावेत. या भूमीचे पौराणिक महत्त्व मोठे आहे. माता रुक्‍मिणीचे हे माहेर आहे. अशा पौराणिक धार्मिक स्थळांच्या विकासाचाही समावेश आराखड्यात करावा, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

आमझरी व विविध ठिकाणी सुरू केलेली झिपलाइन ऍक्‍टिव्हिटी मेळघाटात लोकप्रिय झाली आहे. कोलखासमध्ये चार हत्ती एकत्र आणून हत्ती सफारी सुरू केली. बफर क्षेत्रातील बुद्ध पौर्णिमेच्या उपक्रमाप्रमाणेच जंगलात पौर्णिमेच्या दिवशी मचाणवरून अरण्यदर्शन सुरू केले आहे. हरिसालजवळून वाहणाऱ्या नदीत बोटिंग सुरू केले. वैराट सफारी व भ्रमंतीसाठी बस सुरू केल्या आहेत. स्थानिकांना या सर्व उपक्रमांत सहभागी करून रोजगार दिला जात आहे, अशी माहिती वनअधिकारी श्री. बाला यांनी दिली.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal No 1 : नव्या वर्षात डिजिटल पत्रकारितेचा नेतृत्वाचा मुकुट पुन्हा ई-सकाळकडे, कॉमस्कोअरमध्ये पटकावले अव्वल स्थान

Retirement Plan : आता रिटायरमेंटनंतर पैशांची चिंता नाही! या 5 योजनांत गुंतवणूक करा; तिजोरी भरलेलीच राहील, दरमहा मिळेल मोठी पेन्शन

Tilak Varma Injury: तिलक वर्माला पोटातील तीव्र वेदनेमुळे अचानक करावी लागली सर्जरी! त्याला झालेला अजार नेमका आहे तरी काय?

Mangal Gochar 2026: 18 वर्षांनंतर कुंभ राशीत मंगल गोचर! अग्नि-वायु एकत्र येऊन तयार होतोय अंगारक योग, वृषभसह 'या' 5 राशींच आयुष्य होईल अगदी कठीण!

Latest Maharashtra News Updates Live: आष्टापुरात बिबट्याने तीन बकऱ्यांचा घेतला जीव

SCROLL FOR NEXT