J. P. Nadda sakal
विदर्भ

Gondia News : विकासात्मक धोरणाला महत्त्व - जे. पी. नड्डा

भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे व गडचिरोली-चिमूर मतदारसंघाचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचाराकरिता येथील सर्कस मैदानात सभा पार पडली. त्यावेळी जे. पी. नड्डा बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

गोंदिया - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात महिलांना न्याय मिळत असून, गरिबांना विकासाच्या धोरणात आणले जात आहे. २५ कोटी लोक गरिबीरेषेच्या वर आले. ८० कोटी जनतेला ५ किलो रेशन आमचे सरकार नि: शुल्क देत आहे. विकासत्मक धोरणाला सरकार महत्त्व देत आहे. असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले.

भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे व गडचिरोली-चिमूर मतदारसंघाचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचाराकरिता येथील सर्कस मैदानात सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

दोन विचारधारेच्या विरोधातील लढाई आहे. विरोधकांजवळ भारताच्या विकासाचे व्हीजन नाही तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा फक्त विरोध हाच अजेंडा असल्याची टीका  जे. पी. नड्डा यांनी केली. जातीगत जनगणनेच्या विरोधात भाजप व महायुती नाही. परंतु कॉंग्रेस जातीगत जनगणनेच्या नावावर जातीय राजकारण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही ते म्हणाले.

सभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेना नेते डॉ. दीपक सावंत, राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र जैन यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

भ्रष्टाचार हटवण्याकरिता आम्ही लढतोय तर इंडिया आघाडी भ्रष्टाचारी लोकांना वाचविण्याची धडपड करीत आहे. भ्रष्टाचारी जेलमध्ये अर्धे गेले तर अर्धे बेलवर बाहेर असल्याची टीकाही त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : ...तर माझे खासदार का फोडले- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT