संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

पोलिस कर्मचाऱ्यांच्या पीसीआरमध्ये वाढ

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नंदनवन पोलिस ठाण्याच्या डीबी पथकातील अटक केलेल्या पाचही पोलिस कर्मचाऱ्यांच्या पोलिस कोठडीत वाढ झाली आहे. या कर्मचाऱ्यांचा पीसीआर शनिवारपर्यंत (ता. 26) वाढविण्यात आला आहे. तसेच ड्रग्स तस्कर शेख जावेदला गुन्हे शाखेने अटक केली. पोलिस हवालदार सचिन एम्प्रेडीवार, राजेंद्र शिरभाते, अभय मारोडे, रोशन निंबर्ते आणि दिलीप अवगण अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी या दोषी पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पोलिस कर्मचाऱ्यांनी ड्रग्स तस्कर जमाल शेख याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे 34 ग्रामपेक्षा जास्त एमडी पावडर आढळले. यावेळी आरोपी जमाल पळून गेला. तर काही वेळेनंतर जमालचा साथीदार जावेद अली याला पोलिसांनी रमणा मारोती चौकातून अटक केली. तेथे जमालचा शोध न घेण्यासाठी पोलिसांना पैशाची ऑफर देण्यात आली. 3 लाख 20 हजार रुपयांमध्ये कारवाई न करण्यासाठी डील झाली. त्यावेळी ड्रग्स परत करावा लागेल, अशी अट ठेवण्यात आली. पोलिसांनी जप्त ड्रग्स परत देण्यास होकार दर्शवला. नंदनवन पोलिसांनी ड्रग्स परत करण्यास नकार देत शहरातील अन्य ड्रग्स तस्करांना विक्री करण्याचा प्रयत्न केला. उपायुक्‍त निर्मला देवी यांनी 21 ऑक्‍टोबरला दुपारी एसीपी विजय धोपावकर यांच्याकडून कारवाई करीत पोलिस हवालदार सचिन एम्प्रेडीवारच्या कपाटाची झडती घेतली असता, त्यात एमडी पावडरचे दोन पॅकेट आणि 2 लाख 45 हजारांची रोकड आढळली. ती जप्त करून सोमवारी सायंकाळी या संबंधाने उपरोक्त पाच पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस हवालदार सचिन एम्प्रेडीवार, राजेंद्र शिरभाते, अभय मारोडे, रोशन निंबर्ते आणि दिलीप अवगणे यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या (एनडीपीएस) नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. त्यांना आज बुधवारी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. शासनातर्फे ऍड. पंकज तपासे यांनी बाजू मांडली.
पाच ग्रॅम एमडी जप्त
शहरातील आबूनंतर उदयास आलेला ड्रग्स तस्कर शेख जावेद शेख रहेमान (वय 36, हसनबाग) याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्या ताब्यातून पाच ग्राम एमडी जप्त करण्यात आले. आता पोलिस मुख्य आरोपी जमाल शेख याचा शोध घेत आहेत.
आता सत्य येणार बाहेर!
शेख जावेद याला अटक केल्यानंतर आता या "कांडा'मागे कोण दडलंय, हे बाहेर येणार आहे. तुलसी नावाच्या वृद्धाने शेख जावेदला हाताशी धरून एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला फोन करण्यास सांगितले होते. तुलसीने फक्‍त पोलिस कर्मचाऱ्यांची जिरविण्यासाठी हे कांड केल्याची चर्चा शहरातभरात आहे. त्यामुळे आता तुलसीचीही चौकशी होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT