File photo
File photo 
विदर्भ

गणेश चौधरींच्या पोलिस कोठडीत वाढ

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : कृषी समन्वयित विकास प्रकल्पाचा-कृषिसमृद्धी (केम) तत्कालीन संचालक तथा अहमदनगर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचा प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांच्या पोलिस कोठडीत शुक्रवारी (ता. 27) आणखी तीन दिवसांची वाढ करण्यात आली. आता त्यांना 30 सप्टेंबरला न्यायालयापुढे हजर केले जाईल.
शेतकरी आत्महत्याग्रस्त अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम, बुलडाणा व वर्धा जिल्ह्यासाठी केम प्रकल्प राबविण्यात आला होता. त्यात सुमारे 6 कोटींची अनियमिततेच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने गणेश चौधरींना अटक केलेली आहे. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी (ता. 27) संपुष्टात आल्याने पोलिसांनी कोठडीची मुदत वाढवून देण्याची विनंती प्रथमश्रेणी न्यायालयास केली. न्यायालयाने ही विनंती मान्य करीत गणेश चौधरींच्या पोलिस कोठडीची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढविली.
चौधरींना पहिल्यांदा पोलिस कस्टडी रिमांड मिळाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तथा तपास अधिकारी आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वातील चार सदस्यीय पथकाने त्याला सोबत घेऊन पुणे येथील निवासस्थान तसेच अहमदनगर येथील शासकीय निवासस्थानाची झडती घेतली. या झडतीदरम्यान पोलिसांना आढळलेली केम प्रकल्पाची दोन पुस्तके हस्तगत करण्यात आली. याशिवाय परतीच्या प्रवासात मेहकर तालुक्‍यात उकळी-सुकळी व परतापूर या दोन गावांना भेटी देऊन प्रकल्पस्थळाची पाहणी केली.
चौधरींना आश्रय कुणाचा?
गणेश चौधरी अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी दर्जाचे आहेत. एखादा सरकारी नोकर 48 तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ पोलिस कोठडीत राहिल्यास त्याला सेवाशर्थीनुसार निलंबित केले जाते. चौधरी यांना चार दिवसांत निलंबित केले जाईल, असे मंत्र्यांनी सभागृहात 19 जूनला सांगितले होते. मात्र, ती कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही. त्यांना आश्रय कुणाचा असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
अटकेची माहिती दिली
गणेश चौधरींच्या अटकेची माहिती अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे, असे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT