Industries.jpg 
विदर्भ

आता ...येथे थांबणार नाहीत उद्योग

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यात आतापर्यंत परवाणगी असलेले अन्न प्रक्रिया व कृषी आधारीत ३२८ उद्योग सुरूच होते. आता मात्र संचारबंदीतील मर्यादित शिथिलीकरणानंतर घालून दिलेल्या अटीशर्तींच्या अधिन राहून जिल्ह्यात १२२ कारखाने (उद्योग एकके) सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उद्योगाची चाके गतीमान होणार आहेत.

जिल्ह्यात संचारबंदी शिथील केल्यानंतर औद्योगिक वसाहतीतील उद्योग सुरू करण्याबाबतचे निर्बंध शिथील करण्यात आले होते. त्यानुसार उद्योजकांनी जिल्हाप्रशासनाकडे परवानगीसाठी अर्ज दाखल केले होते. यासाठी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता यांचेकडून प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यात १४१ जणांची उद्योग सुरू करण्याची परवानगी मागितली होती. त्यातील १९ जणांना परवानगी नाकारण्यात आली असून, १२२ जणांना परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या तसेच अन्न प्रक्रिया व कृषी उत्पादन आधारीत उद्योगांचे ३२८ उद्योग सुरुच होते. त्यात ३४१२ कामगार कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली. या सर्व उद्योगात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना करून कामकाज करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

अशी आहे आकडेवारी

  • ३२८ आधी सुरू असलेली कृषी आधारित उद्योग
  • १२२ लॉकडाउननंतर नव्याने सुरू होणारे उद्योग
  • ​१४१ उद्योग सुरू करण्यासाठी मागितली परवानगी
  • १२२ उत्पादन सुरू करण्यास परवानगी मिळालेले उद्योग
  • ३४१२ आधीपासून सुरू असलेल्या उद्योगात काम करणारे कामगार
  • २००० पेक्षा अधिक नव्याने सुरू होणाऱ्या उद्योगात काम करणारे कामगार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांकडून २५०० पानी चार्जशीट दाखल

मोहसिन नक्वींच्या हातून नाकारलेले Asia Cup मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर येणारच, पण...; BCCI सचिवांनी स्पष्टच सांगितलं

Paithan Farmer: खरीप पिके करपली, कर्जाचा ताण वाढला; पैठण तालुक्यात ५२ वर्षीय शेतकऱ्याने संपवलं जीवन

Pune District News: वसतिगृहातून तीन अल्पवयीन विद्यार्थी गायब; १८ दिवस उलटूनही ठावठिकाणा नाही, जुन्नर पोलिसांकडून शोध सुरू

Pune FDA Action: पुण्यात FDAची कारवाई, भूम-वाशीतील खवा-पेढा विक्रेते रस्त्यावर; आमदार तानाजी सावंतांकडून प्रश्नाची दखल

SCROLL FOR NEXT