Kunal kanhere (Battery) sakal
विदर्भ

Crime News : दारूच्या वादातून मित्रांनीच केली कुख्यात बॅटरीची हत्त्या

वानाडोंगरी परिसरात झालेल्या कुणाल ऊर्फ बॅटरी सुनील कन्हेरे या कुख्यात आरोपीच्या खुनाचे रहस्य उलगडले.

सकाळ वृत्तसेवा

हिंगणा - गुरुवारी (ता. २) वानाडोंगरी परिसरात झालेल्या कुणाल ऊर्फ बॅटरी सुनील कन्हेरे या कुख्यात आरोपीच्या खुनाचे रहस्य उलगडले आहे. दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून मित्रानीच डोक्यात दगड घालत कुणालची हत्त्या केली. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून एक जण फरार झाला आहे.

गुरूवारी दुपारी कुणाल हा त्याचा भाऊ रितेशसोबत वानाडोंगरी परिसरात गेला होता. रितेशने कुणालला वानाडोंगरी परिसरात सोडल्यानंतर तेथे संदीप खुणीलाल बोपचे(२४), कार्तिक उमेश मेश्राम (१९), आयुष हेमराज सुरसाउत(१९), आदित्‍य आणि एका विधिसंघर्ष मुलासह पाचही आरोपींची भेट झाली.

त्यानंतर सहा जणांनी दारू घेतली आणि वसंत विहारच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या लेआउटमध्ये गेले. तिथे दारू पिताना किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. एकाने मोठा दगड कुणालच्या डोक्यावर मारला. त्यामुळे तो आणखी चवताळला व त्यांना शिव्या देऊ लागला. त्यामुळे पाचही आरोपींनी कुणालला घेरून त्याच्यावर दगडाने प्रहार केले. दगडांच्या जीवघेण्या प्रहारांमुळे कुणालचा जागेवरच मृत्यू झाला.

हत्त्या केल्यानंतर पाचही आरोपी शहराच्या विविध भागात फरार झाले. इकडे घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त अनुराजग जैन, सहायक पोलीस आयुक्त सतीशकुमार गुरव, ठाणेदार प्रवीण काळे यांच्या मार्गदर्शनात सहा.पोलीस निरीक्षक योगेश मोहिते, प्रशांत साबळे, संजय बनसोड, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राऊत यांचे पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी कामाला लागले.

काही तासातच दोन आरोपींना अटक

कुणाल आरोपींना भेटल्याचे रितेशने सांगताच पोलिसांनी वेगाने तपास केला. घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर गुरूवारी रात्रीच पोलिसांनी संदीप बोपचे आणि कार्तिक मेश्राम या दोघांना अटक केली. तर शुक्रवारी सकाळी आयुष सुरसाउत आणि एका विधिसंघर्षग्रस्त मुलाला अटक केली. तर एक आरोपी फरार झाला असून पोलिस त्याच्या मागावर आहेत.

आरोपींना आठ पर्यंत पीसीआर

अटक केलेल्या चारही आरोपींनी कुणालची हत्त्या केल्याची कबुली दिली आहे. आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चारही आरोपींना आठ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेतील सर्व आरोपी हे वानाडोंगरी नगर परिषद अंतर्गत विविध भागातील रहिवासी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT