Infraction of Collector's Rules 
विदर्भ

नागरिकांना नाही कोरोनाचे डर, रात्री उशिरापर्यंत सुरू असतात हे व्यवहार

डिलेश्वर पंधराम

गोरेगाव (जि. गोंदिया) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तूंची देवाणघेवाण करता यावी, यासाठी किराणा दुकाने व अन्य दुकानांची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ठरवून दिली आहे. परंतु, ग्रामीण भागात या आदेशाची अंमलबजावणी न करता रात्री उशिरापर्यंत किराणा दुकाने सुरू असतात. याकडे गावात स्थापित गाव समितीचे दुर्लक्ष असल्याचे सांगितले जाते.

साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करता यावी, यासाठी आदेश काढले आहेत. ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाव समितीची निवड करण्यात आली. या समितीत सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, तलाठी, कृषीसेवक, अंगणवाडीसेविका, आरोग्यसेविका, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याकडे जबाबदारी सोपवली. शहरी भागात जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सकाळी 9 वाजता उघडतात व सायंकाळी 5 वाजता बंद होतात. परंतु, ग्रामीण भागात याकडे दुर्लक्ष करून नियमित दुकाने सुरू असतात. गावात गाव समिती असली तरी, ही समिती जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करीत नाही. तसेच नाका-तोंडाला मास्क बांधण्यात येत नाही. त्यामुळे गावातील अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. गावात गाव समिती तयार करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष, सचिव व सदस्यांनी आदेशाचे पालन करून कारवाईकरिता माहिती द्यावी.
पी. एन. वाघचौरे, प्रभारी तहसीलदार, गोरेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'होर्मुज'वर काही तासांत तोडगा निघणार? करार झाल्याचा अमेरिकेचा दावा; मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याची शक्यता

Digital Arrest: ‘डिजिटल ॲरेस्ट’च्या नावाने ज्येष्ठ नागरिकाला १९.४५ लाखांचा गंडा; सायबर चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांत गुन्हा

Amazon Container Accident: चालकाला डुलकी लागल्याने ॲमेझॉनचा कंटेनर महामार्गावरील खड्ड्यात पलटी; मोठे नुकसान, मोठी दुर्घटना टळली

Manoj Jarange Warning Meet: माढ्यात मनोज जरांगे-पाटील यांच्या इशारा बैठकीसाठी जोरदार तयारी; विविध समित्यांची स्थापना, मराठा समाजात उत्सुकता

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT