murtizapur farmar.jpg 
विदर्भ

अरे व्वा ! शेतकऱ्यांच्या थेट दारात कृषी निविष्ठा पोहचणार; शेतकरी उत्पादक कंपनी चा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

मूर्तिजापूर (जि. अकोला) : लॉकडाउन मुळे सर्वच व्यवहार जवळपास ठप्प झाले होते, कृषी क्षेत्र चांगलेच आडचणीत सापडले होते अशा स्थितीत मॉन्सून विदर्भाच्या दारात येऊन धडकल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा त्यांच्या दारात उपलब्ध करून देण्याचा श्रीगणेशा तालुक्यात झाला आहे. 

शेतकऱ्यांना होणार आर्थिक फायदा
तालुक्यातील हिरपूर येथे शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या जीवन समृद्धी हायटेक फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या वतीने तालुका कृषी अधिकारी अमृता काळे यांच्या मार्गदर्शनात कंपनीचे सभासद असलेल्या 25 शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे व खते घरपोच देण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचून आर्थिक फायदा झाला. बाजारभावापेक्षा स्वस्त व थेट घरपोच कृषी निविष्ठा मिळाल्यामुळे लहान शेतकऱ्यांनी कंपनी, कृषी विभागाचे आभार व्यक्त केले.

अनलॉकडाउनच्या तिसऱ्या टप्यात मिळालेली ही सुविधा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात धीर देणारी आहे. अन्य शेतकरी बचत गटांनीही आसाच पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना सहकार्य करावे व सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यास हातभार लावावा, अशी अपेक्षा या निमित्याने व्यक्त होत आहे. बियाणे वितरण करताना तालुका कृषी अधिकारी अमृता काळे, पंचायत समिती सभापती उर्मिला डाबेराव, माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव डाबेराव, कृषी सहाय्यक पवार ,कंपनीचे संचालक प्रविण ढगे ,संजय फडनाईक ,दिलीप तिहीले, संदीप मेहरे, मनोज ढगे उपस्थित होते

अशीच सेवा कंपनीच्यावतीने मिळाली पाहिजे
माझ्याजवळ तीनच एकर शेती आहे. त्यामुळे माझ्यासारख्या लहान शेतकऱ्यांना घरपोच बियाणे मिळाल्यामुळे वेळेसोबत आर्थिक फायदा सुद्धा झाला आहे. अशीच सेवा कंपनीच्यावतीने मिळाली पाहिजे.
-गजानन गणोरकर, अल्पभूधारक शेतकरी, हिरपूर.

73 हजार 330 हेक्टर शेतजमिनीतील पेरणीचे लक्ष
शेतकरी बचत गटांनी समोर घेऊन शेतकऱ्यांना घरपोच बियाणे उपलब्ध करून देण्यात पुढाकार घेतल्यास बियाणे उलब्ध करून देता येईल. यंदा 73 हजार 330 हेक्टर शेतजमिनीतील पेरणीचे लक्ष आहे. कृषी सेवा केंद्रांमध्ये बियाणे उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी मागणी नोंदविल्यास कृषी केंद्रांतून शेतकरी गटांमार्फत बियाणे गावात पोचविल्या जाईल.
-अमृता काळे. ताकृअ, मूर्तिजापूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT