The Inspector of Valid Measurement Department in akola was caught taking bribes
The Inspector of Valid Measurement Department in akola was caught taking bribes 
विदर्भ

अकोला : वैध मापन शास्त्र विभागाचा लाचखोर निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

सकाळवृत्तसेवा

अकोला : इंधन वाहक टॅंकरची तपासणी करून ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या वैध मापन शास्त्र विभाग विभाग-2 च्या निरीक्षकास सात हजार रूपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. ही कारवाई बुधवारी (ता. 20) दुपारी 1 वाजता दरम्यान करण्यात आली. लाचखोर निरीक्षकास ताब्यात घेण्यात आले आहे.
 
एका 47 वर्षीय तक्रारदाराच्या तीन इंधन वाहक टॅंकरची वार्षिक तपासणी करून व्यवसाय करण्यास ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात वैध मापन शास्त्र विभाग वर्ग-2 चे निरीक्षक ज्ञानदेव सोपान शिंबरे (वय 50) याने तक्रार दाराकडे सात हजार रूपयांची मागणी केली होती. लाचेची रक्कम देण्याआधीच तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची पडताळणी सोमवारी (ता. 18) करण्यात आली. तर बुधवारी (ता. 20) निरीक्षकाच्या कार्यालयातच सापळा रचून लाचखोर निरीक्षकास लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस उप अधीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ईश्वर चव्हाण, गजानन दामोदर, सुनील राऊत, राहुल इंगळे, सुनील येलोने, सचिन धात्रक, नीलेश शेंगोकार, चालक प्रवीण कश्यप यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT