भंडारा : सेतूकेंद्रावर जमलेली पालकांची गर्दी.
भंडारा : सेतूकेंद्रावर जमलेली पालकांची गर्दी. 
विदर्भ

दाखल्यांसाठी गर्दी 

सकाळ वृत्तसेवा

भंडारा : सामाजिक न्याय विभागातर्फे यावर्षीपासून अडीच लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्यांच्या संख्येत भर पडली आहे. अर्जासह लागणारे जातप्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखला आदी दस्तऐवजांसाठी सेतूकेंद्रात पालकांची झुंबड उडाली आहे. 
दरवर्षी दहावी, बारावीचे निकाल लागल्यानंतर सेतूकेंद्रावर अशी गर्दी दिसून येते. परंतु, यावेळी मात्र, मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या पालकांच्या रांगा लागत आहेत. लवकर काम व्हावे, म्हणून पालक शक्‍य होईल तितक्‍या लवकर सेतूकेंद्र गाठून रांगेत लागतात. त्याच प्रमाणे ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने त्यांना राष्ट्रीयीकृत बॅंकेत खाते उघडणे अनिवार्य आहे. गेल्यावर्षी या योजनेसाठी शाळेमार्फत विद्यार्थ्यांचे अर्ज भरून खाते उघडण्यात आले होते. परंतु, त्यातील काही विद्यार्थ्यांना बॅंकेचे पासबुकच मिळाले नाही. यावर्षी पहिल्या असणाऱ्या विद्यार्थ्याचेसुद्धा बॅंकेत खाते काढायचे आहेत. 
शहरातील स्टेट बॅंक, बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र या बॅंकेचे खातेदार मोठ्या संख्येत असल्याने बाराही महिने गर्दी असते. त्यामुळे इतर राष्ट्रीयीकृत बॅंकांत सध्या मोठी गर्दी दिसत आहे. खाते उघडण्यासाठी लागणारे दस्तऐवज पूर्ण करताना पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या नाकीनऊ आले आहे. विविध त्रुटी दाखवून अधिकारी त्यांना परत पाठवितात. या योजनेसाठी विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्याचे पासबुक आवश्‍यक आहे. तसेच शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या पासबुकची झेरॉक्‍स, जातीचे प्रमाणपत्र, गुणपत्रक आणि यापूर्वी योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र असे कागदपत्र शाळेत जमा करायचे आहेत. त्यासाठी सेतू केंद्रात पालकांची गर्दी वाढली आहे. उत्पन्नाचा दाखलासुद्धा तत्काळ मिळत नसल्याने अनेक पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. शासनाने ठरवून दिलेल्या वेळात कागदपत्रे जमा न झाल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी भीती आहे. शासनाने योजनेची मुदत वाढवावी व त्यासाठी पालकांचे बॅंकखाते ग्राह्य धरावे अशी मागणी होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT