सिहोरा : बानथडी नदीला आंतरराज्यीय पुलावर पाणी वाहत आहे.  
विदर्भ

बावनथडी नदीला पूर आल्याने आंतरराज्यीय वाहतूक बंद...अनेक गावांना पुराचा वेढा

सहादेव बोरकर

सिहोरा (जि. भंडारा) : दमदार पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील बावनथडी प्रकल्प पहिल्यांदा शंभर टक्‍के भरले आहे. या प्रकल्पाची चार दारे उघडण्यात आली आहेत. गेल्या २४ तासांत ८०१ क्‍यूमेक्‍स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. धरण परिसरात ११६ मिमी पावसाची नोंद केली आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावाच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच बावनथडी नदीवरील पुलावरून चार फूट पाणी वाहत असल्यामुळे मध्य प्रदेशमध्ये जाणारा बालाघाट मार्ग सध्या बंद आहे.

बावनथडी नदीच्या पुलावर पाणी वाढल्याने आंतरराज्यीय वाहतूक बंद झाली आहे. काही गावात नदीतील पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सिहोरा परिसरात बावनथडी आणि वैनगंगा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहेत. या नद्यांच्या काठावरील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. आंतरराज्यीय पुलावर धोक्‍याच्या पातळीवर पुराचे पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाने सावधगिरीसाठी बॅरिकेड्स लावून पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत. बपेरा गावात पुराचे पाणी शिरले आहे.

परिसरातील तलाव ओव्हरफ्लो

मध्य प्रदेशातील संजय सरोवराचे पाणी वैनगंगेत सोडण्यात आल्याने नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. या नदीच्या काठावरील सुकडी (नकुल), गोंडीटोला देवरी (देव), कर्कापूर आणि परसवाडा शिवारात पुराचे पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. या परिसरातील अनेक नाले, तलाव ओव्हरफ्लो झाले असल्याचे अनेक गावांचा संपर्क तालुक्याशी तुटला आहे. ग्रामीण भागात कमी उंच असलेल्या पुलावर पुराचे पाणी वाहत आहे. यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक गावात घरांची पडझड झालेली आहे. त्यामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे.

साडेतीन हजार कोंबड्यांचा मृत्यू

मोहाडी : तालुक्‍यातील देव्हाडा खुर्द येथील गोविंद बोंद्रे यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतात पोल्ट्रीफार्म उभारला होता. मात्र, या संततधार पावसामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे शेतातील पोल्ट्रीफार्ममध्ये चार फूट पाणी शिरल्याने साडेतीन हजार कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. आज या मृत कोंबड्या पाण्यावर तरंगताना दिसल्या. यात साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.


कुंभारटोलीला पाण्याचा वेढा

पालोरा : मुंढरी येथील कुंभारटोलीला पुराच्या पाण्याने वेढा घातला असून सुमारे १५ कुटुंबांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. वैनगंगा नदीला पूर आल्यामुळे मुंढरी येथील कुंभारटोलीला पाण्याने वेढा दिला आहे. मोहगाव-निलज मार्गावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. कुंभारटोली येथून बाहेर काढलेल्या कुटुंबांना राहण्याची व्यवस्था मुंढरी येथील शाळेत केली आहे. सरपंच एकनाथ चौरागडे व गावकरी पूरग्रस्तांना मदत करीत आहेत.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

Karad Chain Snatching: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर ‘जॅक’ पडला भारी; कऱ्हाडमध्ये उसातून शोधला सोनसाखळी चोर, श्वानाने काढला माग

SCROLL FOR NEXT