Investigation of sand smuggling will take place after the death of the pregnant woman 
विदर्भ

गर्भवतीच्या मृत्यूनंतर होणार वाळू तस्करीचा तपास; आमदारच म्हणतात, तस्करांना नेत्यांचे अभय

अभिजित घोरमारे

भंडारा : दोन दिवसांपूर्वी वाळूच्या टिप्परने दिलेल्या धडकेत गर्भवतीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आमदारांना जाग आली आणि प्रशासनाला सूचना देत वाळू घाटांवर कारवाई सुरू केली. वाळू तस्करांना जिल्ह्यातील किंवा जिल्ह्याबाहेरील नेत्यांचे अभय आहे. त्यामुळेच त्यांची मुजोरी वाढली आहे. वाळू तस्करीत मोठे अधिकारी गुंतले असल्याचीही शक्यता आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी वर्तविली आहे.

भंडारा जिल्ह्यातील वाळूला विदर्भभर मागणी आहे. त्यामुळे तस्करी जोरात सुरू आहे. वाळूची वाहतूक करणारे ट्रक आणि टिप्पर बेफाम वाहने चालवितात आणि अशाच टिप्परखाली येऊन गर्भवती मृत्युमुखी पडली. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना या प्रकाराची दखल घेण्यासाठी एका महिलेचा जीव जाण्याची वाट का बघावी लागली, असाही प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. राजकीय नेत्यांचा आणि अधिकाऱ्यांचा सहभाग यामध्ये असावा, अशा संशय आमदार भोंडेकर यांना आहे.

मांडवी, वडेगाव रिढी वाळू घाटांवर आमदार भोंडेकर यांनी महसूल आणि पोलिस अधिकाऱ्यांसह भेट देऊन जप्तीची कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. गावाकडील रस्त्यांवर तयार झालेले वाळूचे डोंगर बघून आमदार आणि अधिकाऱ्यांनी तोंडात बोटे घातली.

ते स्वतः लोकप्रतिनिधी असताना त्यांनी लोकप्रतिनिधींवर आरोप करणारे वक्तव्य केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात नवा वाद उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापुढे वाळूच्या चोरीमुळे जर कुणाचा जीव गेला तर जिल्ह्यात याचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पुढारी आणि अधिकाऱ्यांनी आत्ताच सतर्क होण्याची गरज आहे.

मृत्यूनंतर घेतली दखल

घाटांवरून टिप्परद्वारे वाळूची बेफाम वाहतूक होत असते. जागरुक नागरिकांनी वारंवार याच्या तक्रारी प्रशासनाकडे आणि आमदारांकडे केल्या. पण त्याची दखल घेतली गेली नाही. टिप्परच्या धडकेने एक गर्भवती ठार झाल्यानंतर लोक भडकले व आंदोलन झाले. त्यानंतर कुठे आमदारांना जाग आली आणि त्यांनी या प्रकाराची दखल घेतली.

...तर दोघाचाही जीव वाचला असता

पूर्वीच नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली गेली असती तर मनीषा किरणापुरे आणि तिच्या पोटातील बाळ जिवंत असते. वरिष्ठ अधिकारी वाळू तस्करीमध्ये गुंतले असल्याची शंका आमदारांना असेल तर त्यांनी चौकशी करून दोषींना शासन करावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

Viral Video : वजन झेपलं नाही अन् बंजी जंपिंगची दोरी तुटली..खोल दरीत पडून शरीराचे अवयव झाले वेगळे; धक्कादायक मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल

31st December Party : अभी तो पार्टी शुरू हुई है..! बार, पब अन् क्लब मध्ये ‘New Year Celebration’ पहाटे पाच पर्यंत चालणार

Politics: मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात उलथापालथ; विधानसभा उपाध्यक्षांनी दिला राजीनामा, कारण...

Latest Marathi News Live Update: महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक

SCROLL FOR NEXT