devidas kalskar 
विदर्भ

जगण्यापेक्षा मरण बरे नाही का? 

मनोहर बेले

अंबाडा (जि. नागपूर) : "साहेब, इच्छामरणाची परवानगी कुणाकडून घ्यायची हो. आमची तर सरकारनी थट्टाच केली. कर्ज माफ करतो म्हणून पूर्ण पाच वर्षे झाली तरी कर्ज माफ तर झालेच नाही, पण बॅंकेचे अधिकारी घर लिलाव करण्याच्या धमक्‍या देतात. मग जगण्यापेक्षा मरण बरे नाही का' असा सवाल आंबाडा येथील शेतकरी देवीदास कळस्कर यांनी केला. 

देवीदास गणपतराव कळसस्कर हे चार एकरांचे शेतकरी आहेत. दोन मुले, मुलगी व पत्नी असे त्यांचे कुटुंब. 2015 मध्ये त्यांनी शेतीसाठी दोन लाख व पाइपलाइनसाठी एक लाख रुपयांचे कर्ज घेतले. परंतु, दरवर्षीच्या नापिकी व मुलांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चामुळे ते बॅंकेचे हप्ते भरू शकले नाहीत. अशातच सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. 

मुलीचे लग्नाचे वय झाल्यामुळे त्यांनी आपले छोटेसे घर असावे म्हणून थडीपवनीच्या स्टेट बॅंकेतून पुन्हा कर्ज घेतले. या गृहकर्जाचे हप्ते ते नियमित भरत आहेत. ऐन दिवाळीच्या अगोदर अधिकारी त्यांच्या घरी येऊन संपूर्ण कर्ज भरा, नाही तर तुमचे घर लिलावात काढू अशी धमकी देऊन गेले आहेत. आपले ओझे कुठे कमी करावे, असाही प्रश्‍न त्यांना कधी कधी पडतो. त्याच्या घरी कर्ज वसुलीसाठी अधिकारी आल्याची माहिती मिळताच त्यांच्याशी चर्चा केली. 

विचारणा केल्यावर देवीदास म्हणाले, मागील वर्षी दुष्काळ, यंदा अतिवृष्टी, देव आमची परीक्षा पाहतोय का? कर्ज चढलयं, पोट भरावं की मुलांचे शिक्षण करायचे. त्यातच बॅंकेवाले घरी येऊन कर्जवसुलीसाठी तगादा लावत आहेत. जगावं की मरावं, हेदेखील ठरविता येत नाही. देवीदास कळस्कर हे आपबीती सांगत असताना आवाज गहिवरला व डोळे भरून आले. 

व्यवस्थापक म्हणातात, "ही नाटकं आहेत' 
याबाबत थडीपवनीच्या स्टेट बॅंकेचे शाखा व्यवस्थापक डी. डी. हेडाऊ यांच्याशी मोबाईलवरून कर्जाविषयी विचारले असता ते म्हणाले, कर्ज भरताना शेतकरी अशी नाटकं करतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil on Hasan Mushrif : मानाच्या गणपती पूजनानंतर सतेज पाटलांनी हसन मुश्रीफांना केलं टार्गेट; "गोकुळच्या निवडणुकीत पराभव दिसू लागला"

Sugarcane Agitation : माजी खासदार राजू शेट्टी माजी सहकार मंत्र्यांच्या भेटीला ऊस आंदोलनात सहकार्य करण्याची केली विनंती

Water Shortage: अवैध पाणी उपसा करणाऱ्या मोटारी प्रशासनाकडून जप्त

Maharashtra Ganesh Visarjan Live: अलका चौकात गणरायाच्या स्वागतासाठी साकारली भलीमोठी आकर्षक रांगोळी, गणपती मिरवणुकीच्या उत्साहात रंगले पुणे

New Blood Group: वैज्ञानिकांनी शोधला अतिदुर्मिळ 'JAMA' ब्लड ग्रुप! जाणून घ्या रुग्णांना काय होणार फायदा...

SCROLL FOR NEXT