mahan kirana.jpg 
विदर्भ

संकटकाळात हे देखील ग्राहकांची लूट करण्यात मागे नाही

अनिस शेख

महान (जि. अकोला) : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर या स्थितीचा फायदा घेत येथील काही व्यावसायिकांकडून जीवनावश्‍यक वस्तूंची अव्वाच्या सव्वा दरात विक्री सुरू असल्याचे भीषण वास्तव पुढे आले. अनेक किराणा व्यावसायिकांकडून दुकानासमोर वर्तुळ सुद्धा आखण्यात न आल्याने सोशलडिस्टन्सची सुद्धा पायमल्ली केल्याचे दिसून येत आहे. शासनाकडून संचारबंदी लागू केल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंची अव्वाच्या सव्वा दरात विक्री करू नये, अशी ताकीद देण्यात आली होती.

अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत सूचना
किराणा दुकानासमोर होणारी गर्दी टाळण्यासाठी समोर गोल आखण्यात यावे, यातून सोशल डिस्टन्सचा नियम पाळला जाईल, अशा सूचना पोलिस विभागाकडून करण्यात आल्या होत्या. मात्र, येथे या सूचनांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे पहायला मिळत आहे. मूर्तिजापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जून भोसले, उपविभागीय अधिकारी (महसूल) अजयसिंह मोहिते यांनी किराणा दुकान संचालकांना तसेच भाजीपाला विक्रेत्यांना योग्य भावात वस्तूंची विक्री करावी, सायंकाळी सहा वाजता नंतर दुकान बंद ठेवावे अशी ताकीद दिली होती. मात्र याकडेही मुजोर संचालकांनी दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे. जीवनावश्‍यक वस्तूंची अव्वाच्या सव्वा दरात विक्री होत असताना किराणा व्यावसायिकांना या संदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले, कोरोनाविषाणूच्या संसर्गाच्या पृष्ठभूमीवर अकोला येथील बाजारपेठ बंद आहेत. आगाऊ पैसे देऊन मालाची खरेदी करण्यात आली आहे असे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. असले तरी लाकडाऊनमूळे सामान्यांच्या हाताला काम नाही त्यामूळे या लुटीवर पोलीस प्रशासनाने, अन्न व औषधी विभागाने लक्ष केंद्री करुन किराणा व्यवसायिक तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे

लॉकडाऊननंतर दर चढले
लॉकडाऊनपूर्वी महान येथे तेलाचे दर 85 रुपये प्रति किलो, साखरेचे दर 36 रुपये किलो, तर तुरदाळ 70 असे दर होते. शासनाने संचारबंदी केल्यानंतर ही परिस्थिती धक्कादायक पद्धतीने बदली. तेलाचे दर 115 रुपये किलो, साखर 40 रुपये किलो, तुरदाळ 95 रुपये किलोने विकली जात आहे. सध्या कोरोनामूळे रोजगार ठप्प झालेत. त्यामूळे सामान्यांनी जीवन कसे जगावे, हा प्रश्न असतानाच किराणा व्यवसायिकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढणे म्हणजे नागरिकांच्या अडचणीत भर घालण्यासारखे आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

SCROLL FOR NEXT