It's strange to hear; The wonderful miracle of nature took place here 
विदर्भ

ऐकावे ते नवलच; इथे घडला निसर्गाचा अद्भुत चमत्कार

रविकांत वरारकर

भद्रावती (जि.चंद्रपूर) : तालुक्‍यातील गुडगाव येथील शेतकऱ्याच्या घरी कपाळावर एक डोळा व नाक नसलेल्या विचित्र वासराला गाईने जन्म दिला आहे. शारीरिक व्यंग असलेल्या विचित्र वासराचा जन्म झाल्याने येथील नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे.

गुडगाव येथील शेतकरी बाळू जरूरकर यांच्याकडे पाच वर्षापासून पाळीव गाय आहे. तिने जन्म दिलेल्या वासराचा संपूर्ण आकार परिपूर्ण असला तरी कपाळावर एक डोळा असून त्याला नाक नाही. ते वासरू तोंडाव्दारे श्वासोश्वास घेत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. हे वासरू जन्मानंतर ठणठणीत असून जिवंत असल्याचे जरूरकर यांनी सांगितले आहे.
गाईचा प्रसूतीकाळ पूर्ण न झाल्याने कदाचित वासराच्या शरीराची पूर्ण वाढ झाली नसावी असे जाणकारांचे म्हणणे आहे. सध्या वासरू गाईचे दुध पित नसून त्याला वरचे दुध पिण्यास दिले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT