Accident sakal
विदर्भ

Accident : जालंधर येथील अपघातात बेलसरे कुटुंबातील चौघांचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी

मेळघाटातील सोलामहू गावावर शोककळा.

सकाळ वृत्तसेवा

चिखलदरा/जामली - सैन्यदलात कार्यरत मुलाला पंजाब राज्यातील जालंधर येथे सोडून वैष्णोदेवीचे दर्शन करून परत येत असताना जालंधर-पठाणकोट महामार्गावर रसालपूर येथे झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे मेळघाटातील सोलामहू गावावर शोककळा पसरली आहे.

चिखलदरा तालुक्यातील सोलामहू येथे गानूजी बेलसरे यांचा मोठा मुलगा लोकेश हा सहायक शिक्षक तर लहान मुलगा मंगेश सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कार्यरत आहे. नातेवाइकांकडे विवाह समारंभ असल्याने तो पंधरा दिवसांच्या रजेवर आला होता. बेलसरे कुटुंब वैष्णोदेवी दर्शन व मुलाला सोडण्यासाठी ३० एप्रिलला सोलामहू येथून स्वत:च्या खासगी वाहनाने निघाले. मंगेश कर्तव्यावर हजर राहण्यासाठी जालंधरला पत्नीसह उतरला आणि परिवारातील उर्वरित सदस्य वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी निघाले.

परतीच्या प्रवासावर असताना त्यांच्या कारला ट्रकने मागून धडक दिली. यात गाडीचा चुराडा होऊन गानू बेलसरे (वय ५८), लोकेश गानू बेलसरे (वय ४५), अनिषा लोकेश बेलसरे (वय ४०), निहारिका (वय ११ महिने, रा. सोलामहू) यांचा मृत्यू झाला तर श्रीराम कासदेकर (वय ४०) आणि सरस्वती कासदेकर (वय ३८) गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जालंधर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती कळताच गावावर शोककळा पसरली आहे.

जालंधर (पंजाब) येथे बीएसएफमध्ये कार्यरत मंगेश बेलसरे यांनी मला फोनवर घटनेची माहिती दिली. स्थानिक पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. लवकरच जालंधर पंजाब येथून सोलामहू येथील राहत्या घरी मृतदेह आणण्यात येतील.

- केवलराम काळे, माजी आमदार, मेळघाट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

'दातापासून ते चेहऱ्याच्या हावभावापर्यंत; ‘दुआ तर अगदी रणवीरची कॉपीच’ नेटकऱ्यांनी रणवीरचे लहाणपणीचे फोटो काढले शोधून, Photo Viral

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

SCROLL FOR NEXT