नागपूर - शूटिंग संपल्यानंतर असा जल्लोष करण्यात आला.
नागपूर - शूटिंग संपल्यानंतर असा जल्लोष करण्यात आला. 
विदर्भ

‘झुंड’चे शूटिंग आटोपून ‘शहेनशहा’ मुंबईला

सकाळवृत्तसेवा

नागपूर - झोपडपट्टीतील मुलांना खेळाची नवी दिशा दाखविण्यासाठी उपराजधानीतील ‘स्लम सॉकर’ संकल्पनेवर नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ सिनेमाच्या शूटिंगसाठी अमिताभ बच्चन तब्बल ३७ दिवस नागपुरात होते. अभिनयाच्या या शहेनशहाने नुकतेच ‘झुंड’चे शूटिंग आटोपून मुंबई गाठली. ३ डिसेंबर २०१८ ते ११ जानेवारी २०१९ या काळात त्यांनी नागपूर तसेच आजूबाजूच्या परिसरात शूटिंग केले. ११ जानेवारीला झुंड टीमने जल्लोषाच्या वातावरणात शेवटचा शॉट ओके केला.   

‘झुंड’च्या शूटिंगसाठी बिग बी नागपुरात आल्याचे समजताच चाहत्यांनी सेंट जॉन शाळेच्या परिसरात तोबा गर्दी केली होती. पहाटेपासूनच या परिसरात लोक ठिय्या मांडून बसायचे. पहिले दोन दिवस बच्चन यांचे दर्शन नागपूरकरांना झाले नाही, मात्र त्यानंतर हळूहळू बच्चन यांनी चाहत्यांना अभिवादन करण्यास सुरुवात केली. पोलिस आयुक्त भूषणकूमार उपाध्याय यांच्यापासून तर ज्यांच्या कथानकावर ‘झुंड’चा पाया रचला ते प्रा. विजय बारसे, शाळेतील मुले गावखेड्यातील चाहते, यांच्याशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी बिग बींनी संवादही साधला. 
 
चिमुकल्याला घेतले कडेवर 
झुंडचे शुटिंग सुरू असताना झोपडपट्टीतील चार वर्षांचा चिमुकला खेळत-खेळत आला. बाजूला झुंडचे दिग्दर्शक नागराज मंजुळे उभे होते. त्यांच्या शेजारी अमिताभ बच्चन. चिमुकला बच्चन यांच्या पायाजवळ आला. त्यांच्या पायाला हात लागल्याचे दिसताच मंजुळे यांनी या चिमकुल्याला अलगद उचलले. दरम्यान, हे या महानायकाने बघितले आणि त्या झोपडपट्टीतील मुलाला कडेवर घेतले आणि सोबत फोटोही काढला. हे भारावलेले दृश्‍य बघून या परिसरात उभे असलेले सारे कलावंत आश्‍चर्याने बघत होते. बिग बी यांनी फोटो काढल्यानंतरच त्या चिमुकल्याला खाली सोडले. खांद्यावर हात ठेवत त्याच्या आईच्या स्वाधीन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT