Job Teachers Vacancies education Right to Information wardha sakal
विदर्भ

माहितीच्या अधिकारात रिक्त पदांची पोलखोल

प्राथमिक विभागात सर्वाधिक रिक्त पदे; कसा उंचावणार शैक्षणिक निर्देशांक?

प्रभाकर कोळसे

नंदोरी (जि. वर्धा) : राज्यात प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांची ३१ हजार ४७२ पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात उजेडात आली आहे. प्रदीप दराडे यांनी मागविलेल्या माहितीला प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिलेल्या उत्तरात ही बाब उघड झाली आहे. राज्यात तब्बल ११ वर्षांपासून मराठी आणि उर्दू शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची भरती झालीच नाही. २०१९ मध्ये राज्यात शिक्षक भरतीवरील बंदी उठली आहे. परंतु, अद्याप शिक्षकांच्या रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरू होत नसल्याचे दिसून येते. एकीकडे देशात महाराष्ट्राचा शिक्षण निर्देशांक उंचाविण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जात असताना दुसरीकडे मात्र शिक्षकांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे अनिवार्य आहे. याच नियमाच्या आधारानुसार सध्या राज्यात ३१ हजार ४७२ जागा रिक्त आहेत. २०११ मध्ये राज्यात काही खासगी शैक्षणिक संस्थांनी बोगस विद्यार्थिसंख्या दाखवून शिक्षक भरती केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यानंतर राज्यात शिक्षक भरतीवरच बंदी घातली होती. दरम्यान, २०१९ मध्ये तत्कालीन महायुतीच्या सरकारने ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून शिक्षक भरती आनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला होता.

राज्यात प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांसाठी मंजूर असलेल्या २ लाख ४५ हजार ५९१ प्राथमिक शिक्षकांच्या पदांपैकी २ लाख १४ हजार ११९ शिक्षक कार्यरत असून ३१ हजार ४७२ पदे रिक्त आहेत. यामध्ये सर्वाधिक वाईट अवस्था जिल्हा परिषद शाळांची आहे. या शाळांमध्ये शिक्षकांची २ लाख १९ हजार ४२८ पदे मंजूर आहेत. यापैकी १ लाख ९९ हजार ९७६ शिक्षक कार्यरत असून तब्बल १९ हजार ४५२ जागा रिक्त आहेत. महापालिकेच्या शाळांमध्ये १९ हजार ९६० पदे मंजूर असून केवळ ८८६२ शिक्षक कार्यरत आहेत. छावणी शाळांमध्ये मंजूर असलेल्या १६६ पैकी २१ जागा रिक्त आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाचे उद्घाटन चर्चेत

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT