The job was lost, the engineer was rescued by "Idli" 
विदर्भ

या व्यवसायासाठी पहाटे तीनपासून घ्यायचा मेहनत, अखेर दिवस पालटले आणि... 

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : कोरोनाच्या वादळात अनेक जण उद्धवस्त झाले. काहींनी मृत्यूला कवटाळले. काही परिस्थितीपुढे हतबल झाले. काहींनी या संकटातही संधी शोधली. त्यातीलच एक चंद्रपुरातील पलाश जैन. तो मॅकेनिकल इंजिनिअर आहे. टाळेबंदीत त्यालाही आपली नोकरी गमावावी लागली. परंतु तो निराश झाला नाही. नव्या उमेदीने छोटासा व्यवसाय सुरू केला. तो आता रोज सकाळी शहरात गर्दीचे ठिकाण, रुग्णालय, दुकान, भाजीविक्रेत्यांकडे स्वत: जाऊन इडली विकतो. त्याची जिद्द परिस्थितीसमोर हताश झालेल्या हजारो युवकांना नवी उमेद देणारी आहे. 

चंद्रपुरातील तुकूम परिसरातील पलाश जैन या युवकाने नाशिक विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर तो औरंगाबाद येथे नोकरीला लागला. कुटुंबात आई-वडील आणि दोन भाऊ. एक बी.कॉम.ला आहे. दुसरा नवव्या वर्गात. वडील जनता महाविद्यालयात तृतीय श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. येत्या दोन महिन्यात ते सेवानिवृत्त होईल. दोन भावांच्या शिक्षणाची आणि कुटुंबीयांची जबाबदारी पलाशच्या खांद्यावर आहे. नोकरी लागल्याने कुटुंब आनंदी होते. पलाशही कुटुंबाची काळजी घेत होता. 

मात्र, कोरोनाचे वादळ आले आणि अनेकांचे आयुष्य 360 डिग्रीच्या कोनात वळले. त्यात पलाशही होता. त्यांच्या कंपनीतील जवळपास तीनशे लोकांना नोकरीवरून काढण्यात आले. त्यात पलाशचेही नाव होते. टाळेबंदीच्या आधी तो चंद्रपुरात आला. येथेच त्याला नोकरी गेल्याचा निरोप मिळाला. तब्बल दोन महिने तो घरीच बसून होता. काही दिवस तोही नैराश्‍यात होता. परंतु लवकरच पलाशने स्वत:ला सावरले. त्यांच्या घराजवळील एसटीवर्क शॉप चौकात टाळेबंदीच्या काळात सकाळी भाजीविक्रेते बसायचे. 

सकाळी गावखेड्यातून लोक भाजी घेऊन यायचे. दुपारपर्यंत टळटळीत उन्हात भाजी विकायचे. मात्र उपहारागृह बंद असल्याने या लोकांना नाश्‍ता, जेवण मिळायचे नाही. कोरोनाच्या संकटात सारेच होरपळून निघाले होते. या संकटातून पलाशने संधी शोधली. पलाशला कुुकींगची आवड आहे. नाशिक, पूणे, औरगंबाद भागात तो राहीला आहे. तिथे सकाळी गर्दीच्या ठिकाणी जावून नाश्‍ता विकणाऱ्यांची पद्धत आहे. हीच पद्धत त्याने चंद्रपुरात सुरू करायचे ठरविले.

त्याने इडलीचा पर्याय निवडला. मात्र सुरवातीच्या काळात त्याला प्रतिसाद मिळाला नाही. कोरोना संसर्गाची भीती. त्यामुळे कुणी त्याच्याकडून इडली घ्यायला तयार नव्हते. सुरवातीचे चार दिवस तर केलेल्या इडल्या कुटुंबीयांनाच खाव्या लागल्या. सामान्य भाजीविक्रेत्यांकडूनही इडलीची मागणी नव्हती. मात्र त्याने हार मानली नाही. पहाटे तीन वाजता उठून इडली तयार करायची आणि सकाळी सहा वाजता भावासोबत ग्राहकांच्या शोधात निघायचे हे त्याने सुरूच ठेवले. 

टाळेबंदी शिथील झाल्यानंतर मैदानावर लोकांना व्यायामाची परवानगी देण्यात आली. हीच त्याच्यासाठी सुवर्णसंधी ठरली. शहरातील मोकळ्या मैदानावर तो ग्राहकांच्या शोधात फिरायला लागला. त्याला आता बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. रूपयात पाच इडली आणि चटणी तो देतो. स्वच्छतेकडे त्याचे कटाकक्षाने लक्ष असते. आता तो रूग्णालय, छोटे व्यावसायिक यांना इडली विकत आहे. 

 
खूश नाही पण समाधानी 
कुटुंबाला काही हातभार लागावा, यासाठी हा व्यवसाय सुरू केला. यात "खूश' नाही मात्र 'समाधानी' आहे. एरवी उच्चविद्याभूषित युवकाची नोकरी गेली की ते नैराश्‍यात जातात. प्रसंगी मृत्यूलाही कवटाळतात. परंतु कोणाताही व्यवसाय छोटा नसतो. तुमची करण्याची इच्छा हवी. संकटातही मार्ग निघतो. 
पलाश जैन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

Junnar News : जुन्नर शहरात श्री तुळजाभवानी माता पलंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT