संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

नोकरी लावून देतो, युवकाने मुलाखत दिली आणि पुढे काय झाले...

संतोष तापकिरे

अमरावती : नोकरी लावून देण्याचे खोटे आश्‍वासन देऊन चार व्यक्तींनी एका युवकाची फसवणूक केली व त्याच्याकडून जवळपास अकरा लाख रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर युवकाने पोलिस ठाणे गाठले.


नंदूरबार येथे सूक्ष्म व लघुद्योग विभागात नोकरी लावून देण्यासाठी आरोपींनी खोटी मुलाखत घेतली. ऑर्डर काढण्यासाठी वेळोवेळी पैसे घेऊन एकाची तब्बल 11 लाख 35 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आशीष सुरेखराव डाहाके (वय 29) हे भातकुली तालुक्‍यतील साहूर येथील रहिवाशी असून ते शेती करतात. त्यांची हितेश तिमांडे (वय 25), अमोल इंगोले (वय 28), सुभाष कावळे (वय 54) तसेच रवी राजमोरे (वय 45) यांच्याशी ओळख झाली. सूक्ष्म व लघुद्योग विभागात नोकरी लावून देतो, असे सांगत त्यांनी आशीषकडे 15 लाखांची मागणी केली.

त्यानुसार आशीषने मार्च 2017 मध्ये 50 हजार तसेच 11 एप्रिल 2017 ला नंदूरबार येथे मुलाखत झाल्यानंतर 50 हजारांची रक्कम सुभाष कावळेच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केली. यादरम्यान आरोपींच्या सांगण्यावरून आशीषने जयस्तंभ चौक येथे राम विधळे नामक व्यक्तीला दोन लाख रुपये दिले. लगेच ऑर्डर निघणार असून 15 दिवसांत रक्कम जमा करण्यास सांगितल्यानंतर आशीषने सुभाष कावळे याच्या खात्यात 19 एप्रिल 2017 ला तीन लाख 70 हजार, तर 18 मे रोजी तीन लाख रुपयांची रक्कम टाकली. अशाप्रकरे आरोपींकडून 11 लाख 35 हजार रुपये घेण्यात आले, मात्र ऑर्डर दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आशीष डाहाके यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या आधारे पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हे दाखल केले.

संपादन - नरेश शेळके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या आता फक्त विनंती बदल्या! राज्य सरकारचा मोठा निर्णय, आंदोलनाला यश

Maruti Suzuki Car Rate: मारुती सुझुकीच्या गाड्या महागणार! ३० हजार रुपयांपर्यंत दरवाढ होणार; पण कधीपासून? जाणून घ्या...

GT vs CSK Live: साई सुदर्शन-शुभमन गिलचा वर्ल्ड रेकॉर्ड! यांच्याशी जो नडला, त्याला यांनी गाडला; IPL मधील सर्वात यशस्वी ओपनर्स...

Eknath Shinde Photo Removed Ichalkaranji : इचलकरंजी महापालिकेतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार धैर्यशिल माने यांचे छायाचित्र हटविले; शिवसेना आक्रमक

GT vs CSK Live: शुभमन गिल Out असूनही मैदानावर उभा राहिला, चेन्नईचा तिथेच कार्यक्रम झाला; गुजरातच्या कर्णधाराने मोडले अनेक विक्रम

SCROLL FOR NEXT