Water Tank Sakal
विदर्भ

Water Tank : पाण्याच्या टाकीतून काढला पाच ट्रक गाळ

येरखेडा गावातील रनाळा-येरखेडा संयुक्त जलशुद्धीकरण केंद्रातून तब्बल पाच ट्रक गाळ काढण्यात आला. पाण्याची टाकी स्वच्छ करण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

येरखेडा गावातील रनाळा-येरखेडा संयुक्त जलशुद्धीकरण केंद्रातून तब्बल पाच ट्रक गाळ काढण्यात आला. पाण्याची टाकी स्वच्छ करण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे.

कामठी - येरखेडा गावातील रनाळा-येरखेडा संयुक्त जलशुद्धीकरण केंद्रातून तब्बल पाच ट्रक गाळ काढण्यात आला. पाण्याची टाकी स्वच्छ करण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. अनेक वर्षांपासून टाकीची स्वच्छताच झाली नसल्याने नळातून गढूळ पाणी येत असल्याची नागरिकांची तक्रार होती. तसेच ग्रामस्थांमध्ये विविध साथरोग बळावत असल्याने तातडीने टाकीची स्वच्छता करण्यात आली.

नळातून दूषित पाणी येत असल्याची तक्रार रनाळा-येरखेडा गावच्या सरपंच सरिता रंगारी यांच्याकडे येत होत्या. त्याची दखल घेऊन रंगारी यांनी स्वत: जलशुद्धीकरण केंद्रात जाऊन पाहणी केली. टाकीची अवस्था पाहून त्यांनी तातडीने स्वच्छतेचे काम सुरू केले. मजुरांनी चार दिवस राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत टाकीतून तब्बल पाच ट्रक गाळ आणि कचरा काढला. स्वच्छतेनंतर जलशुद्धीकरण केंद्राची माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर, पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी यांनी पाहणी केली. नळाला गढूळ पाणी येत असून मुलांना पोटदुखीचा त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी सरपंचांकडे येत होत्या. टाकीत मोठ्या प्रमाणात गाळ व माती साचली असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने नागरिकांच्या आरोग्याशी निगडित समस्या सरपंच रंगारी यांनी तातडीने सोडवली. रनाळा, येरखेडावासीयांना आता शुद्ध पाणी मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

चार-पाच दिवस युद्धस्तरावर टाकी स्वच्छतेचे काम करण्यात आले. यापूर्वी ग्रामपंचायतीत सत्तेत असलेल्यांच्या दुर्लक्षित वृत्तीचा फटका नागरिकांना बसला. गढूळ पाण्याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने टाकीची पाहणी करून स्वच्छतेचे आदेश दिले. नागरिकांना आरोग्यदायी जीवन देणे, हेच प्रथम कर्तव्य मानते.

- सरिता रंगारी, सरपंच, रनाळा-येरखेडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

Elderly Doctor Cheated: वृद्ध महिलेच्या देखभालीच्या बहाण्याने दोन कोटींची फसवणूक

Latest Marathi News Update : महाराष्ट्रासह देशभरातील आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! महाराष्ट्रासह 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 85 किमी वेगाने वाहणार वारे; माॅन्सून परतण्यापूर्वी वाढणार चिंता

SCROLL FOR NEXT