विदर्भ

अनेक वर्षांनंतर कन्हानचे रौद्ररूप 

सकाळ वृत्तसेवा


नागपूर : मध्य प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कन्हान व पेंच नदीला यावर्षी पहिल्यांदा पूर आला आहे. पेंच नदीवरील तोतलाडोह व नवेगाव खैरी ही दोन्ही जलाशये पूर्णतः भरली असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने पारशिवनी, कामठी, मौदा व कुही तालुक्‍यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कन्हान नदीने अनेक ठिकाणी धोक्‍याची पातळी गाठली तर जिल्ह्यातील अनेक गावांचा पुरामुळे संपर्क तुटला. 
तब्बल पंचवीस वर्षांनंतर एवढा मोठा पूर नागरिकांनी पाहिल्याचे मत नागरिकांनी नोंदविले. विशेष म्हणजे केवळ कन्हान नव्हे तर पेंच नदीलाही पूर आला होता. नवेगाव खैरी धरणाचे 16 पैकी 12 दरवाजे दोन मीटरने तर चार दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले होते. तोतलाडोहचे 23 पैकी चौदा दरवाजे एक मीटरने उंच केले होते. तोतलाडोहमधून 1 हजार 443.54 क्‍युमिक पाण्याचा विसर्ग होता. नवेगाव खैरी जलाशयातून 2 हजार 943 क्‍युसेक पाणी पेंच नदीपात्रात सोडण्यात येत होते.
कोलार व पेंचचे पाणी आधीच पुराने भरून वाहणाऱ्या कन्हानमध्ये आल्याने कामठी, मौदा व कुही तालुक्‍यात नदीने रौद्र रूप धारण केले होते. कोलार नदीवरील उमरी जलाशय ओव्हरफ्लो झाल्याने पूर आला. शाळेकरी मुलांना सुटी देण्यात आली. सावनेर येथून आंगेवाडा, पटकाखेडी येथील लोकांना त्रास सहन करावा लागला. 
पारशिवनी तालुक्‍यातील जुनी कामठी येथील नदीकाठावरील एका कुटुंबाला स्थलांतरित करण्यात आले. पिपरी मार्गे जुनी कामठी, गाडेघाट या रस्त्यावर असलेला वेकोलिचा नाला भरल्याने गावांचा संपर्क तुटला. रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मौदा-माथनी पुलावर सुमारे 5 फूट पाणी होते. तालुक्‍यातील नानादेवी पुलावर सुमारे 10 फुट पाणी होते.
कन्हान, पेंच नद्यांना आलेल्या पुरामुळे नदीपात्राजवळील सुमारे वीस छोटी दुकाने पाण्यात बडून विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यासोबतच नदीकाठावर भाजीपाला लागवड करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांना पुराचा फटका बसला, त्यांच्या वाड्या वाहून गेल्या.

नवेगाव खैरी, घोगरा येथे बघ्यांची गर्दी 
पारशिवनी तालुक्‍यातील नवेगाव खैरी जलाशयाचे सर्व सोळा दरवाजे उघडण्यात आल्याची माहिती तालुक्‍यात पसरताच आसपासच्या गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली. घोगरा महादेव येथे पेंच नदी खडकाळ भागातून वाहत असल्याने येथे नदीला धबधब्याचे स्वरूप आले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आज मतदान! मोबाईल घेऊन जाऊ नका, फोटो-व्हिडिओ काढल्यास दाखल होईल गुन्हा; एकच बॅलेटवर दोन्ही उमेदवार, मतदान कसे करायचे? ‘हे’ ओळखपत्र असेल तरी करता येईल मतदान

बापरे! दिव्या शिंदेला बिग बॉसने काढलं घराबाहेर, जीवे मारण्याची दिली धमकी, नक्की काय घडलं?

उजनी धरणात 113 TMC पाणी! भीमा नदीत 15 फेब्रुवारीपर्यंत पाणी तर शेतीचे आवर्तन 28 फेब्रुवारीपर्यंत असणार; पुढे ‘या’ महिन्यात सुटणार दोनदा पाणी, वाचा...

Thalapathy Vijay News : मद्रास उच्च न्यायालयाकडून थलापती विजयला आणखी एक धक्का; दीड कोटींचा दंड भरावा लागणार

U19 World Cup: पुणेकराचं मार्गदर्शन अन् टीम इंडियाने जिंकला वर्ल्ड कप! भारतीय क्रिकेटचे भविष्य घडवणारा मराठमोळा प्रशिक्षक

SCROLL FOR NEXT