चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथे तारीख 11 ला कार्तिकस्वामी त्रिजंठा उत्सव मोठ्या हर्ष उल्लासा भक्तिमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आला.
शिरजगाव कसबा - चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथे तारीख 11 ला कार्तिकस्वामी त्रिजंठा उत्सव मोठ्या हर्ष उल्लासा भक्तिमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. एक दशकापासून हा कार्तिक समाप्ती उत्सव ग्रामस्थांकडून मोठ्या वर्षे उल्लासात दरवर्षी साजरा करण्यात येतो. आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावामध्ये हेच एकमेव कार्तिकस्वामी यांचे या गावातील भव्य भुयारातील मंदिर आहे.
पौराणिक महत्त्व लाभलेल्या मेघा नदीच्या काठावर व सातपुडा पर्वत रागांच्या कुशीत असणारे शिरजगाव कसबा गावातील कार्तिकस्वामी त्रिजटा उत्सवाला शिव पुराणातील पौराणिक संदर्भ आहे .
कार्तिक स्वामी मंदिराच्या वरच्या बाजूला साईबाबांचे मंदिर व भुयारात जाताना पंचमुखी कार्तिकस्वामींची मूर्ती विराजमान आहे. मागच्या बाजूला वाहन मोर उभा आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे साईबाबा व गणेश जिचे दर्शन स्त्रियांना घेता येते. परंतु, कार्तिकस्वामीचे दर्शन घेण्यास स्त्रियांना मुख्य गाभाऱ्यात प्रवेश नसतो ,स्त्रियांना कार्तिक महिन्यामध्येच पौर्णिमेलाच फक्त दर्शन घेता येते. याला पुरातन ग्रंथामध्ये पौराणिक संदर्भ आहे. विदर्भामध्ये येथे हे एकमेव मंदिर असून, दरवर्षी त्रिजटा उत्सवाला पौर्णिमेचे तिसरे दिवशी विदर्भातील लाखो भाविक एकत्र येत असतात.
कार्तिक स्वामींच्या मंदिराच्या समोरील आठवडी बाजार परिसरात दरवर्षी श्रीमद् भागवत सप्ताह तसेच महाप्रसादाचे आयोजन मंदिर समितीतर्फे करण्यात येतात. कार्तिक महिन्यामध्ये गावातील प्रत्येक भागातून महिनाभर पहाटे काकड दिंडी आरती काढली जाते. व त्रिजंठा उत्सवाला रथ काढून कार्तिक स्वामी मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर दहीहंडी केली जाते. सर्व भाविक उपस्थित महाप्रसाद घेतात. या रथोत्सवात सर्वच नगर भागातून भव्य रथ फुलांनी सजविलेले सहभागी होतात. राम लक्ष्मण वेशभूषा केलेले रथातील लहान बालके सर्वांचे आकर्षण असते रथोत्सवाच्या समोर पारंपारिक वाद्य, टाळ, मृदंग, दिंडी, भजन मंडळी समोर असतात. या गावांतील सासरी गेलेल्या मुली दिवाळीला न येता या कार्तिक त्रिजंठा उत्सव पाहण्यासाठी भाऊबीज करण्यासाठी गावात आवर्जून येत असतात.
ही परंपरा अनेक वर्षांपासून आजही सांभाळत आहे. लाखो भाविकांची या महोत्सवाला उपस्थिती असते. त्यामुळे पोलीस प्रशासन स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय व महावितरण कंपनी यांचे मोलाचे सहकार्य लाभते. एवढ्या मोठ्या संख्येने होत असलेल्या या उत्सवाची प्रशासनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक उत्सवामध्ये नोंद नसल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र असणाऱ्या या गावाचा विकास करताना निधी अपुरा पडत आहे. यावर्षी उत्सवाला स्थानिक खासदार आमदारांची उपस्थिती असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.