

A Satirical Portrait of a ‘Democratic’ Family
Sakal
आज आम्ही एका लोकशाही कुटुंबाचा परिचय करुन द्यायला उभे आहो. सदरील परिचयपत्र आम्ही उभ्यानेच लिहीत आहो, कां की अतीव आदराच्या भावनेने आम्ही बसू शकत नाही. आम्हीच काय कोणीही बसू शकत नाही. किंबहुना, हा मजकूर वाचता वाचता तुम्हीही आपोआप उठून उभे राहाल, आणि नकळत मजकुराचा कागद हातातून गळून पडेल. कां की तुमचे दोन्ही हात नमस्कारासाठी आपोआप जोडले जातील. गोरगरीबांचे कैवारी, जनतेचे आद्य सेवक, लोकशाहीचे शिपाई असलेले आदरणीय वंदनीय श्रीश्रीश्री आबासाहेब तिकटे यांच्याबद्दल आम्ही सांगत आहो. आबासाहेबांची यशोगाथा साधीसुधी दिवाळीतली कथा नव्हे, तर तो लोकशाहीचा पोवाडा आहे, जनसेवेचे संकीर्तन आहे. मानवतेचा मळा आणि गळाही आहे.