file photo
file photo 
विदर्भ

Video : शहीद राकेशच्या अंत्यसंस्काराला लोटला जनसागर 

सकाळ वृत्तसेवा

काटोल (जि. नागपूर) : येथील पेठबुधवारचा रहिवाशी असलेल्या राकेश देविदास सोनटक्‍के या सैनिकाचा युद्ध सरावादरम्यान रविवारी मध्यरात्री मृत्यू झाला होता. त्याच्या पार्थिवावर आज बुधवारी काटोल येथील हेटी स्मशान घाटावर शासकीय इंतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या अंत्ययात्रेला हजारो नागरिकांनी हजेरी लावून श्रद्धांजली वाहिली. 

शिक्षण सुरू असतानाच राकेश सोनटक्‍केने आर्मीच्या नोकरीला सुरुवात केली होती. तो 502 आसाम राज्यातील डिंगजाम येथे आर्मी सप्लायर कोरमध्ये तैनातीवर होता. वीस दिवसांपूर्वी नियमित युद्धसराव करीत असताना त्याच्या डोक्‍याला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी कोलकाता येथील आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर वीस दिवस उपचार सुरू होते. मात्र उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर त्याची रविवारी रात्री 11:50 वाजता प्राणज्योत मालवली. 

काटोलवासींचा उर अभिमानाने भरला 
त्याच्या पाश्‍चात पत्नी रुचिता, पृथ्वी हा एक वर्षाचा मुलगा, वृद्ध पिता, आई रेखा, थोरला भाऊ रोशन व धाकटा सूरज यासह बराच मोठा आप्तपरिवार आहे. विशेष म्हणेजे, राकेश कुटुंबातील एकटाच नोकरीवर होता. त्याचे दोन भाऊ रोज मजूरीचे काम करतात. राकेशने सैन्यात जाऊ कुटुंबाचे नाव केले. तर कर्तव्यावर असताना त्याचा मृत्यू झाल्याने काटोलचे नावही अमर झाले आहे, असेही मत यावेळी व्यक्त करण्यात येत होते. राकेशचा मृत्यूने त्याच्या कुटुंबात शोक असला तरी घरातील एकमेव सरकारी नोकरीत असलेल्या मुलाचा देशसेवा करताना प्राणांची आहुती दिल्याचा अभिमान त्याच्या कुटुंबासह काटोलवासीयांना आहे. 

काटोलवासीयांनी घेतले अंतिम दर्शन 
कोलकोता येथून मंगळवारी रात्री राकशेचा मृतदेह नागपुरात पोहचला. त्याच रात्री तो काटोल येथील त्याच्या पेठ बुधवारी येथील घरी आणण्यात आला. रात्री उशीरापर्यंत व सकाळी त्याच्या पार्थिवाचे काटोवासींनी अंतिम दर्शन घेतले. बुधवारी सकाळी 10 वाजता पेठबुधवार येथून त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. धवड पेटोलपंप, बसस्थानक, शहीद स्मारक, डॉ आंबेडकर चौक या मार्गे हेटी स्मशान घाटावर पोहचली. काटोलवासींनी त्याच्या पार्थिवावर फुले वाहून श्रद्धांजली दिली. दोन गाड्यावर मोठे फलक लावून अंत्ययात्रा काढण्यात आली होती. 

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 
काटोल शहरवासींयासाठी हा दुखद मात्र अभिमानाचा क्षण होता. शहीद राकेशचा मृतदेह तिरंग्यात आणण्यात आला होता. अंत्यदर्शनाच्यावेळी त्याच्या पार्थिवावर राष्ट्रध्वज ठेवण्यात आला होता. सरकारी अधिकाऱ्यांनी त्याच्या अंत्यसंस्कारासाठी वसंतराव देशमुख प्रतिष्ठाणच्या शववाहिनी उपलब्ध करून देण्यात आली होती. फुलांचे हार लावण्यात आले होते. वाहनासमोर पूर्ण गणवेशातील सैन्य दलातील जवान व पोलिस जवान होते. एनसीसी कॅडेट्‌सही अंत्ययात्रेत सामील झाले होते. 20 रायफलधारी जवानांनी हवेत फैरी झाडून सलामी दिली. 

सरकारी अधिकारी झाले सामील 
यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, तहसीलदार अजय चरडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. नितीन पांडे, सैनिक कल्याण संघटक सुभेदार नरेंद्र दवे, उपविभागीय पोलिस अधिकारी नागेश जाधव, ठाणेदार महादेव आत्रेकर, माजी सैनिक संघटनेचे राम कोरके, पुरुषात्तम जोगेकर, रत्नाकर ठाकरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शहीद राकेश सोनटक्के यास श्रद्धांजली देण्यासाठी संपूर्ण बाजारपेठ दुपारी दोनपर्यंत बंद होती. विक्रेता संघाने देखील श्रद्धांजली वाहिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : भाजपचा रायबरेलीतून उमेदवार ठरला; या नेत्याला मिळाली संधी

SCROLL FOR NEXT