kaundanyapur reserach digging found ancient statue of goddess rukmini teosa amravati  Sakal
विदर्भ

Amravati News : कौंडण्यपूरात खोदकाम करताना आढळली प्राचीन मूर्ती; परिसरातील भाविकांची दर्शनासाठी गर्दी

ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीच्या मंदिराला लागूनच असलेल्या एका घरात खोदकाम करताना दगडावर कोरलेली प्राचीन मूर्ती आढळून आली. शोभाताई बबनराव डंबे असे घर मालकाचे नाव आहे.

सकाळ वृत्तसेवा

- प्रशिक मकेश्वर

तिवसा : ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीच्या मंदिराला लागूनच असलेल्या एका घरात खोदकाम करताना दगडावर कोरलेली प्राचीन मूर्ती आढळून आली. शोभाताई बबनराव डंबे असे घर मालकाचे नाव आहे. या मूर्ती ब्रम्हा-विष्णू-महेश देवतांची असल्याचा सांगण्यात येते.

विदर्भाची पुरातन राजधानी, माता रुख्मिणी सह पंचसतीचे माहेरघर व कुलस्वामिनी अंबिका मातेचे शक्तिपीठ असलेल्या तिवसा तालुक्यातील श्री क्षेत्र कौंडण्यपूरला प्राचीन इतिहास लाभलेला असून त्याची प्रचिती व पुरावे आपल्याला महाभारत यासारख्या महाग्रंथामध्ये पाहायला मिळतात.

त्याचबरोबर कौंडण्यपूर येथे सुद्धा अनेक वस्तू व साहित्य संपदा आजही आपल्याला दिसून येते. याठिकाणी अनेक वेळा पुरातत्त्व विभागाने संशोधन केले असून काही पुरावे सुद्धा आढळले आहे, अशातच आता आणखी एक पुरावा समोर आला असून कौंडण्यपूर येथे श्री रुक्मिणी मातेच्या मुख्य मंदिराला लागूनच असलेल्या शोभाताई बबनराव डंबे यांच्या घरी बांधकाम सुरू असताना ५ फुटाच्या दरम्यान एक प्राचीन मूर्ती आढळली आहे.

सदर मूर्ती अखंड पाषाणापासून तयार केलेली असून तीन देवतांच्या प्रतिकृती या पाषाणामध्ये कोरल्या गेल्या आहे. याबाबतचती माहिती पुरातत्त्व विभागाला देण्यात आली असून सध्या ही मूर्ती जवळच असलेल्या शिवमंदिर येथे डंबे कुटुंबीयांनी विधिवत पूजा अर्चना करून ठेवली आहे.

घराच्या परिसरात खोदकाम सुरू असताना मजुरांना एकाच दगडावर कोरलेल्या अशाच तीन मुखाची मूर्ती आढळून आली. आम्ही त्याची विधिवत पूजा करून ही मुर्ती शिव मंदिरात दर्शनासाठी ठेवली आहे. या आधी सुद्धा अशीच मूर्ती निघाली होती.

- शोभाताई डंबे, घरमालक.

प्राचीन असा इतिहास असलेल्या या कौंडण्यपूर भूमीच्या परिसरात कुठेही खोदकाम केल्यास ऐतिहासिक असे अवशेष आढळून येतात. जमिनीत आढळून आलेल्या मूर्ती व इतर अवशेष हे पुरातत्त्व विभागाने सांभाळून ठेवल्या असून याबाबत आम्ही त्यांना सूचना दिल्या आहेत.

-अतुल ठाकरे, मंदिराचे विश्वस्त.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT