crop loan sakal
विदर्भ

Crop Loan Distribution : खरिपासाठी बावीसशे कोटी पीक कर्जवाटपाचे ‘टार्गेट’

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे टार्गेट निश्‍चित करण्यात आले आहे.

चेतन देशमुख

यवतमाळ - यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे टार्गेट निश्‍चित करण्यात आले आहे. पीककर्ज वाटपाचा आराखडा तयार करण्यात आला असून बँकांना उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे.

सन २०२४-२०२५ या वर्षातील खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचा आराखडा जिल्हा अग्रणी बँकेमार्फत तयार करण्यात आला आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात दोन हजार दोनशे कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. सध्या पीककर्ज वाटपाला गती आलेली नाही.

बँकेकडून सर्व शाखांना कर्जवाटपासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मे महिन्यात बँकेमध्ये पीककर्जांसाठी शेतकऱ्यांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या दोन महिन्यांपासून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा ‘ज्वर’ चढला होता. प्रशासन निवडणुकीच्या कामात तर नागरिक निवडणुकीत दंग होते.

निवडणूक आटोपल्यानंतर आता प्रशासनाने कामाला सुरवात केली आहे. खरीप हंगामात दरवर्षी शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करण्यात येते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उद्दिष्ट वाढविण्यात आले आहे. यंदा जिल्ह्यातील दोन लाख १७ हजार ५६५ शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे कोटीचे पीककर्ज वाटप केले जाणार आहे.

बँकनिहाय खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

बँक - रक्कम (कोटीमध्ये)

राष्ट्रीयीकृत बँका - १,१६०कोटी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक - ७२५कोटी

ग्रामीण बँक - १९५ कोटी

खासगी बँका - ११९ कोटी

राष्ट्रीयीकृत बँकांवर ‘वॉच’

पीककर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँकांची टक्केवारी कमी असते. चार वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बँकांना वठणीवर आणण्यासाठी कठोर भूमिका घेतली होती. त्यामुळे कर्जवाटपाची टक्केवारी वाढली. गेल्या वर्षी बँकांनी समाधानकारक पीकर्जवाटप केले. यंदाही राष्ट्रीयीकृत बँकांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, अशी ताकीद जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT